पालकमंत्री धनंजय मुंडे घेणार जिल्ह्याचा आढावा.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा.
बीड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. 10 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि योजनांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
या बैठकीत बीड जिल्ह्यात शासकीय यंत्रणामार्फत सुरु असलेल्या विविध विकास योजनांची तसेच कामांची सद्यस्थिती, त्यामधील अडचणी, नवीन प्रस्तावित कामे, निधीची उपलब्धता, प्रलंबित कामे, प्रस्तावित कामे, यासह मंजूर निधी, खर्च झालेला निधी आणि आवश्यक निधी, जनतेला भेडसावणारे प्रश्न आदींचा आढावा घेण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील शासकीय विभागातील रिक्त पदे, प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी, रेल्वे प्रकल्प, रस्ते, पूल, ग्रामीण, जिल्हा आणि राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणे, शेतकरी आत्महत्या आणि अनुदान वाटपाची सद्यस्थिती, वीज पुरवठ्याच्या तक्रारी आदींचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. या आढावा बैठकीसाठी बीड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीमंडळ सदस्य व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
00000