खडतर पत्रकारितेचे चीज झाले..
डोंगरचा राजा / आँनलाईन
– ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता.
– वडवणीतील भूमिपुत्राच्या खडतर पत्रकारितेचे चीज झाले.
वडवणी – वडवणी येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव दिगंबरराव वाव्हळ यांना नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने अधिस्विकृती पत्रिका देऊन त्यांना अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मागील ४० वर्षांपासून वडवणी सारख्या ग्रामीण भागात प्रामाणिक, निस्वार्थ, निष्कलंक व परखडपणे पत्रकारिता करणाऱ्या सच्च्या भूमिपुत्राच्या खडतर पत्रकारितेचे यानिमित्ताने चीज झाले आहे अशी भावना वडवणीकरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्तमरित्या व प्रामाणिकपणे कामगिरी पार पाडणाऱ्या पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका ही देण्यात येते. पत्रकारिता क्षेत्रात अधिस्विकृती पत्रिकेला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण महाराष्ट्र शासनाचा एक भाग म्हणून त्या व्यक्तीला ओळखले जाते. समाज व शासन यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करण्याची संधी याद्वारे त्यांना मिळत असते. दरम्यान वडवणी येथील दैनिक झुंजार नेताचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव दिगंबरराव वाव्हळ यांना नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने अधिस्विकृती पत्रिका देऊन त्यांना अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यांनी मागील ४० वर्षांपासून वडवणी तालुक्यासारख्या ग्रामीण व मागास तालुक्यातील भागात तत्परतेने पत्रकारिता करुन विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्यामध्ये वडवणी तालुक्याचे नाव गौरवाने कोरले गेले आहे. दरम्यान अधिस्विकृती पत्रिकेच्या या यशामध्ये वडवणी तालुक्याचे भूमिपुत्र तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, दैनिक झुंजार नेताचे संपादक अजित वरपे, निवासी संपादक श्रीपती माने, उपसंपादक संतोष मानूरकर, अधिस्विकृती समितीचे विभागीय अध्यक्ष वसंत मुंडे, अधिस्विकृती समितीचे सदस्य संपादक अनिल वाघमारे, अंबाजोगाई येथील पत्रकार दत्ता आंबेकर, केज येथील पत्रकार श्रावणकुमार जाधव यांसह अन्य मान्यवरांचे प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य निश्चितच लाभले आहे. दरम्यान आगामी काळात या अधिस्विकृती पत्रिकेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या,अडचणी व सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आपले अखंडितपणे चालू असलेले हे व्रत्त असेच अविरतपणे सुरू राहील अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अधिस्विकृतीधारक पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांची अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून निवड झाल्याचे समजतात वडवणी येथे साई आशीर्वाद ट्रेडर्सच्या वतीने त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार केशवराव आंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव आंधळे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक मधुकरराव धस, संपादक अनिलराव वाघमारे, युवा नेते संजय आंधळे, युवा नेते अमोल आंधळे, युवा उद्योजक रणजीत धस, युवा नेते युवराज शिंदे, पत्रकार सुधाकर पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनेही सुभाषराव वाव्हळ यांचा गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हानुमंतराव डिगे, माजी चेअरमन नारायणराव डिगे, चेअरमन कचरुशेठ झाडे, व्हाईस चेअरमन सर्जेराव महाराज आळणे, संचालक उपमन्यू वारे, सुरेशराव ढवळशंक, अर्जून भंडारे, व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी, दताञय पारखे, अशोक भैरट, अविनाश वाव्हळ, ज्ञानेश्वर गुरसाळी, सचिन म्हेञे, ईश्वर ढवळशंक, राहूल बागडे, ज्ञानेश्वर डिगे, लखन टिकुळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांच्या या अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांचे वडवणी तालुक्यातून सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.