Home » माझी वडवणी » वडवणी येथे दर्पण दिन साजरा.

वडवणी येथे दर्पण दिन साजरा.

वडवणी येथे दर्पण दिन साजरा.

डोंगरचा राजा / आँनलाईन.

मराठी पत्रकार परिषद,वडवणी तालुक्याच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वडवणी येथे दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिक्षक डांबे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य शेतकरी, शेतमजूर,दीनदलित आणि वंचित लोकांचे प्रश्न सोडविण्याची कामगिरी करीत न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग पत्रकारांनी करावा असे मत पत्रकार अशोक निपटे यांनी व्यक्त केले. तर मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सदस्य तथा डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांनी वडवणी येथील पत्रकार हे सामाजिक जाणिवेतून समाज हिताच्या बातम्या प्रकाशित करीत असल्याचे सांगून भावी काळात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचाराची पत्रकारीता करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पत्रकार विनायक जाधव यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सामाजिक प्रश्न शासनव्यवस्थेच्या समोर आणून
वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सदस्य अनिल वाघमारे,पत्रकार अशोक निपटे, पत्रकार विनायक जाधव, पत्रकार सुधाकर पोटभरे, पत्रकार सुधाकर शिंदे, पत्रकार सतीश सोनवणे, पत्रकार ओम साबळे सह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.