Home » माझा बीड जिल्हा » पाटोदा येथे दर्पण दीन साजरा

पाटोदा येथे दर्पण दीन साजरा

पाटोदा येथे दर्पण दीन साजरा

अमोल जोशी / पाटोदा.

पाटोदा येथे पत्रकार मित्रमंडळाच्या वतीने *गेल्या दहा वर्षांपासून वसंतराव नाईक विद्यालय येथे पत्रकार मित्रमंडळ साजरा करतात दर्पण दीन* *पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय जाधव यांचाही सत्कार*
शहरातील वसंतराव नाईक विद्यालय येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दर्पण दीन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्य क्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार तुकाराम तुपे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे पत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष नगरसेवक विजय जोशी हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुण सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. प्राचार्य तुकाराम तुपे व पत्रकार विजय जोशी व जायभाय सर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी माहिती देऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले ,तसेच विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटोदा येथील पत्रकार विजय जाधव यांना गगाई बाबाजी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करून शुभेछा देण्यात आल्या. दर्पण दीना निमित्त आयोजित या कार्यक्रमास पत्रकार विलास भोसले, विजय जाधव, अजीज शेख, दिगंबर नाईकनवरे ,अमोल जोशी, हमीद पठाण ,दत्ता देश माने ,अजय जोशी, जावेद शेख ,सचिन शिंदे इत्यादी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख गणी सर यांनी तर आभार मस्कर सर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published.