प्रकाश सोळंके यांचा आमदारकीचा राजीनामा.?
डोंगरचा राजा / आँनलाईन.
– प्रकाश सोळंके यांचा आमदारकीचा राजीनामा,विस्तारानंतर नाराजी नाट्य
बीड -राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वच पक्षात नाराजी नाट्य सुरू झाले असून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे उद्या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत .मंत्रिमंडळात डावल्ल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे,त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला खिंडार पडणार हे स्पष्ट झाले आहे .
माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता,80 तासांच्या सरकारमध्ये देखील सोळंके यांचा सहभाग होता,त्यानंतर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती,मात्र त्यांना डावलले गेल्याने सोळंके नाराज झाले,त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ घेतली असून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे .