Home » माझी वडवणी » डीडीआर जरा बैठकीत बोला – अँड.अजित देशमुख.

डीडीआर जरा बैठकीत बोला – अँड.अजित देशमुख.

डीडीआर जरा बैठकीत बोला – अँड.अजित देशमुख.

डोंगरचा राजा / आँनलाईन

जिल्हा बँकेच्या संचालकांची ३१ डिसेंबर रोजी सभा

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड बीड या जिल्हा बँकेच्या चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी चौकशी नंतर केलेल्या हकालपट्टी नंतर पहिली सभा दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी एक वाजता बँकेच्या श्रीपतराव कदम सभागृहात होत आहे. यात दोषी नसलेल्या संचालकांनी, आज पर्यंत गैरहजर असलेल्या संचालकांनी दक्षता घ्यावी. जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, बीड यांनी एकदा तरी या बैठकीत तोंड उघडावे. घोटाळेबाज लोकांवर अजून कारवाई बाकी आहे. त्यात शासन प्रतिनिधी म्हणून तुमचा नंबर लागू देऊ नका, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या चौकशी तील अहवाल, अन्य घोटाळे हा टोपली खाली झाकून ठेवलेला विस्तव आहे. हा कधी भडका घेईल आणि जेलमध्ये घालेल, याची दक्षता सर्व संचालकांनी घ्यावी.

विभागीय सह निबंधकांच्या आदेशानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कमी करण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या संचालकांची सभा ३१ डिसेंबर रोजी बोलावण्यात आलेली आहे. मात्र यापूर्वीच अध्यक्ष बदलल्याचे बातम्या आल्या आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वांच्या विषयांमध्ये मागील संचालक मंडळाच्या सभेच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या सभेच्या इतिवृत्ताला आणि कार्यकारी समितीच्या दि. १५ नोव्हेंबर २०१९ च्या इतिवृत्ताला मान्यता देणे याबाबतचा समावेष आहे.

राज्य बँके कडील अल्प मुदत शेती कर्ज खात्यावरील थकबाकी रकमेवरील चर्चा व निर्णय घेणे, विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्या दिनांक १९ डिसेंबरच्या निर्णयावर चर्चा करून निर्णय घेणे आणि कर्जमाफी मधून वसूल झालेल्या रकमे मधून संस्थांच्या दोन टक्के गाळा मिळण्याबाबत आलेल्या पत्र वर चर्चा करून निर्णय घेणे, असे महत्त्वाचे विषय बैठकीत चर्चेला येणार असून अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळेस येणारे विषय घेतले जाणार आहेत. जन आंदोलनाचे असे म्हणणे आहे की, पहिला निर्णय विभागीय सह निबंधकांच्या आदेशाप्रमाणे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटविण्याबाबत घेण्यात यावा. त्यांना सभेनेही अपात्र ठरवावे. यानंतर रितसर आणि कायद्याला धरून निर्णय घेण्यात यावेत.

अपात्र लोकांना जर सभेत बोलण्याची, निर्णय घेण्याची आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची संधी दिली तर होणार निर्णय बेकायदेशीर ठरतील त्यामुळे सर्व संचालकांनी याची दक्षता घ्यावी. जिल्हा उप निबंधकांनी बैठकीत सर्व मुद्यांवर बोलावे. गप्प बसण्याची भूमिका घेऊन भ्रष्ट कामाला समर्थन देण्याची भूमिका घेऊ नये.

असेही म्हटले जाते की, बँकेतील काही संचालक निर्दोष आहेत. ते सभांना हजर राहत नाहीत. कुठल्याही निर्णयावर त्यांची सही नाही. त्याचप्रमाणे या सर्व संचालकांनी कोणत्याही बैठकीला हजेरी लावून निर्णय प्रक्रियेत भाग घेतलेला नाही. त्यांच्या मते हे सर्व संचालक निर्दोष आहे त्यामुळे जन आंदोलनाने सर्व संचालकांना आवाहन केले आहे की, अशा सर्व संचालकांनी आपले लेखी अर्ज बैठकी दरम्यान सादर करून अर्जाची प्रत जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधक कार्यालयात पाठवावी. म्हणजे कोण दोषी आहे आणि कोण दोषी नाही, हे जनतेला कळेल.

दोषी नसलेल्या संचालकांनी आपला सहभाग नसल्या बाबत, आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित नसल्याबाबत आणि बँकेच्या कारभारात ढवळाढवळ केली नसल्या बाबत तसेच आपण कायम गैरहजर असल्याबाबत लेखी स्वरूपात नोंद बैठकीच्या इतिवृत्तात नोंदवून संबंधित कार्यालयांमध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

या बैठकीत सेवा सहकारी सोसायटी कडून मागणी झालेल्या दोन टक्के गाळ्याची रक्कम देण्या बाबतचा निर्णय घ्यायचा आहे. सेवा सोसायट्यांवर जिल्हा बँक सातत्याने अन्याय केला आहे. दोन टक्के गाळा सोसायट्यांना देणेबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही. मात्र घोटाळ्यानी बरबटलेली बँक ही दोन टक्के रक्कम न देता ही रक्कम देखील स्वतःच्या कारभारात वापरात आलेली आहे. हे अनेक वेळेला चौकशीत निष्पन्न झाली आहे.

” निर्लज्जम सदासुखी ” असा कारभार करणाऱ्या लोकांनी कोणते ठराव आणि कोणते विषय चर्चेला घ्यावेत, हे देखील विसरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत असून सर्व संचालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

जिल्हा बँक ही जनतेची बँक आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचा कणा म्हणून या बँकेला ओळखली जाते. या बँकेत गोंधळ घालणारे संचालक आणि गैर कारभार प्रोत्साहन देणारे संचालक पुन्हा एकदा जनते समोर यावेत, हीच अपेक्षा जनता जन आंदोलनकडून व्यक्त करत आहे. ज्या प्रमाणे जिल्हा बँकेत मागे कारवाई झाली त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होईल, असेही अँड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.