Home » माझा बीड जिल्हा » हाडाचा आजार बीडात बरा होणार

हाडाचा आजार बीडात बरा होणार

हाडाचा आजार बीडात बरा होणार

डोंगरचा राजा / आँनलाईन

– हाडाच्या आजारासाठी बीडात आता केरळीयन आयुर्वेदीक उपचार
डॉ.सचिन रेवणवार यांचे श्रेयश स्पाईन केअर दालन सुरू

बीड – वैद्यकिय क्षेत्रात आयुर्वेद उपचार पद्धतीला अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर महत्व आले असुन लोकांची गरज ओळखुन येथील श्रेयश आयुर्वेदीय चिकित्सालयाचे डॉ.सचिन रेवणवार यांनी खास जिल्ह्यासाठी मणक्याच्या आजारावरील शास्त्रशुद्ध आयुर्वेद चिकित्सा व केरळीयन पंचकर्म विभाग हे नवे दालन सुरू केले असुन खऱ्या अर्थाने आता हाडाच्या रूग्णांनी मुंबई-पुणे-औरंगाबाद जाण्याची गरज नाही. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्समध्ये सुरू केलेल्या या चिकित्सालयात अत्याधुनिक उपकरणं, नवनविन तंत्रज्ञान आणि सुसज्ज असा विभाग तयार झाल्याने डॉ.रेवणवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ.सचिन रेवणवार गेल्या दोन दशकाहुन अधिक बीड शहरात श्रेयश आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातुन लोकांची सेवा करत आहेत. अलीकडच्या काळात आयुर्वेद शास्त्र पद्धतीला वैद्यकिय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले असुन नवनविन संशोधन आणि चिकित्सा याद्वारे मोठे मोठे आजार चांगले होत असल्याचे लक्षात येत आहे. रेवणवार यांची प्रॅक्टीस मोठ्या प्रमाणावर सुरू असुन मुंबई-पुणे सारख्या शहरात सुद्धा त्यांचे क्लिनिक सुरू आहे. पंचकर्म, अग्निकर्म, वमन, लेप, स्टोप अशा विविध प्रक्रिया करून रूग्णांच्या आजारावर आयुर्वेद शास्त्राने उपचार केले जातात. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेद डॉक्टर्स पुढे आलेले आहेत. असे असले तरी आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या साठी काही तरी वेगळी सेवा द्यावी या हेतुने ज्या आजाराने सद्या मोठ्या प्रमाणावर लोक त्रस्त आहेत त्या हाडांच्या रूग्णांच्यासाठी श्रेयश स्पाईन केअर या नावाने अत्याधुनिक आयुर्वेद शास्त्र शुद्ध उपचार पद्धती दालन त्यांनी सुरू केले आहे. आयुर्वेदात केरळ उपचार पद्धती महत्वाची मानल्या जाते. या चिकित्सालयात त्यांनी खास केरळहुन मणक्याच्या आजारासाठीचे तज्ञ कर्मचारी बोलावलेले आहेत. या रूग्णालयात त्यांनी आयपीटीडी म्हणजे आंतर रूग्ण विभाग सुरू केला असुन आता निवासी व्यवस्थाही रूग्णांची केली आहे. महिलांच्या साठी स्वतंत्र विभाग आहे. गेल्या अनेक दिवसापासुन रेवणवार यांनी अशा प्रकारची उपचार प्रणाली सेवा बीडमध्ये कार्यान्वित करावी अशी मागणी होत होती. अखेर ही उपचार पद्धती त्यांनी सुरू केली आहे. दि.25 डिसेंबर रोजी या चिकित्सालयाचा शुभारंभ त्यांनी आपले आई-वडिल सौ. रत्नप्रभा व श्री विठ्ठलराव यांच्या शुभ हस्ते केला आहे. त्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यासह बीड शहरातुन मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार, रूग्ण, हितचिंतकाने प्रत्यक्ष चिकित्सालयात भेट देवुन शुभेच्छा दिल्या. वास्तविक पाहता व्यवसायात आगळं वेगळं काही सुरू केलं की अलीकडच्या काळात पुढारी किंवा इतर नामवंत यांना आणुन उद्‌घाटन केल्या जाते. मात्र डॉ.सचिन रेवणवार यांनी आपल्या नव्या दालनाची सुरूवात जन्मदात्या आई-वडिलांच्या शुभ हस्ते व त्यांच्याच आशिर्वादाने केल्याचा नविन आदर्श युवकांना दाखवुन दिला आहे. याप्रसंगी राज वैद्य, समिरजी जमदाग्नी,पुणे, रामदासजी आवाड कोपरगाव, महेश बिर्ला जळगाव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या चिकित्सालयात डॉ.सौ.प्रगती रेवणवार, डॉ.सौ.बकुल कवडे, डॉ.सौ.आश्र्विनी जाधव आदींचा सहभाग राहणार आहे. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, श्री मार्कंडेय महादेव मंदिरा शेजारी, सारडा सेंट्रल समोर हे चिकित्सालय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.