Home » क्राईम स्टोरी » शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

डोंगरचा राजा / आँनलाईन

– क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर कारमध्ये केला अत्याचार..

– अंबाजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

अंबाजोगाई – विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी जालना येथे गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची तिच्या क्रीडा शिक्षकाने छेड काढली. त्यानंतर अंबाजोगाई परतल्यानंतर तिच्यावर कारमधेच अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षकावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिक्षक – विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेमुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

शाम दिगंबर वारकड (वय ४३) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. शाम वारकड हा अंबाजोगाईतील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर आहे. नुकतेच ऑक्टोबर महिन्यात जालना येथे विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी १७ ऑक्टोबर रोजी शाम वारकड हा त्याच्या विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला घेऊन कारमधून जालन्याला गेला होता. जालना येथे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पिडीत बालिकेस आपण जेवणासाठी जाऊ असा बहाणा करून त्याने तिच्याशी छेडछाड केली. त्यानंतर जालना येथून परत येत असताना रात्री ७.३० ते ८.३० च्या दरम्यान त्याने वाटेतच अंबाजोगाईच्या क्रीडा संकुलावर कार थांबविली. या ठिकाणी त्याने कारमधेच त्या बालिकेवर अत्याचार केला. तसेच, या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पिडीत बालिकेला दिली. त्यामुळे भेदरलेल्या बालिकेने याप्रकरणी मौन बाळगले. परंतु त्यानंतर दररोज शाळेत तिच्या चेहऱ्यावरील सततेचे नैराश्य आणि उदासीनता तिच्या इतर शिक्षकांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे शिक्षकांनी तिला आस्थेने विश्वासात घेऊन विचारले असते तिने घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकांनी ही माहिती पिडीतेच्या पालकांना दिली. त्यानंतर त्या पिडीत बालिकेच्या पालकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. याप्रकरणी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून शाम वारकड याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत. शाम वारकड याला पोलिसांनी जेरबंद केले असून त्याला गुरुवारी न्यायालासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

▪ शैक्षणिक क्षेत्रात खळबळ :

अंबाजोगाई शहरात ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. अंबाजोगाई सारख्या शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरातील या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

▪ प्रकरण जलदगती न्यालयात चालवा : आ. नमिता मुंदडा

गुरु-शिष्य यांच्या नात्याला काळीमा फासनारा हा दुर्देवी प्रकार आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकाला कठोर शासन करावे अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

▪ तपास लवकर पूर्ण करणार :

आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. तसेच, तपास लवकरात लवकर पूर्ण करून फास्ट ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-राहुल धस, पोलीस उपअधीक्षक

▪ आरोपीला कठोर शिक्षा करा :

सदरील प्रकार अतिशय घृणास्पद असून शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारा आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी.
-आशा दौंड, माजी जि.प. उपाध्यक्षा

▪ तपासात पूर्ण सहकार्य करणार :

घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून संताप आणणारा आहे. सदरील शिक्षकास तत्काळ सेवेतून निलंबित करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना विद्यालयाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.
-सुनंदा धर्मपात्रे, मुख्याध्यापिका, खोलेश्वर विद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published.