Home » ब्रेकिंग न्यूज » ईटकुर फाट्याला प्रति टोल कशासाठी..?

ईटकुर फाट्याला प्रति टोल कशासाठी..?

ईटकुर फाट्याला प्रति टोल कशासाठी..?

डोंगरचा राजा / आँनलाईन

– जनआंदोलनाने लेखी उत्तर मागितले – अँड.अजित देशमुख

बीड – टोल खालून जाताना टोल नाका वाल्यांनी जो रस्ता केलेला आहे, तो प्रत्येक वाहनाने वापरलेला असतो. म्हणून या रस्त्यावरून जाताना टोल द्यावा लागतो. या टोल खालून पूर्ण वाहणे जावीत, या उद्देशाने अन्य रस्त्याने जाणारी वाहने अडवून जर टोल खालून जा, असं सांगण्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. ईटकुर फाट्यावर प्रति टपरी टोल टाकण्याचा आय. आर. बी. चा उद्देशच तसा योग्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संदर्भात लेखी खुलासा जन आंदोलने मागितला आहे, अशी माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

कोणतेही वाहन टोल खालून जाताना त्याने तो रस्ता काही अंतरा पुरता का होईना वापरलेला असतो. मात्र टोलनाक्या खालूनच जा, अन्य रस्त्याने जाऊ नका, असे सांगण्यासाठी जर प्रति टोटोल पोलीस चौकी सारखा उभारला जात असेल तर ते अन्यायकारक वाटते. अशा प्रकारची तरतूद आय. आर.बी. च्या नियमांमध्ये आहे का ? ईटकुर फाट्यावर हा टपरी टोल कशासाठी लावला आहे ? याला कोणत्या नियमाचा आधार आहे ? या टोल नाक्यावर आजपर्यंत किती रक्कम जमा केलेली आहे ? अथवा येथून जाणारी किती वाहने अडवून टोल खालून पाठवली आहेत ? याची माहिती जन आंदोलनाने मागवली आहे.

त्याबाबतचा लेखी खुलासा जन आंदोलनाने टोल प्लाझा येथील ऑफिस चालकांना, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई आणि दिल्लीस्थित टोल प्लाझा ऑफिसला लेखी स्वरुपात मागणी केली आहे. जनतेकडून प्राप्त झालेल्या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे की, बीड औरंगाबाद रस्त्यावरून जाताना ईटकुर फाटा लागतो. हा फाटा बीड कडून जाताना पाडळसिंगी टोल नाक्याच्या अलीकडे आहे. या फाट्यावरून ईटकुर सह अन्य काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे.

लोकांची वेगळी काम असतात. त्यामुळे लोक या रस्त्याने चार चाकी वाहन, तीन चाकी वाहन त्याचप्रमाणे सहा चाकी वाहन देखील घेऊन जातात. ही वाहने जात असताना टोल नाका चालकांनी प्रतिटोल उभारून दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी हायवे वरून या रस्त्याला वाहन उतरत असेल तर ते वाहन अडवतात. टोलनाक्या खालून जा, असं सांगतात. ही बाब कुठल्याही तरतुदीत बसू शकत नाही, असे जन आंदोलनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे जनतेची तक्रार रास्त वाटते. याबाबत जन आंदोलनाने टोल चालकांना लिखित स्वरूपात उत्तर मागितली असून तसे निवेदन दिलेले आहे. याबाबतचा खुलासा तात्काळ न आल्यास जन आंदोलनाला कायदेशीर रीतीने दुसरे पाऊल उचलावे लागेल. त्याच बरोबर या भागातून जा-ये करणाऱ्या दररोजच्या वाहन चालकांची बैठक घेऊन पुढील आंदोलन आखावे लागेल, असा इशाराही देण्यात आलेले आहे .

एकीकडे भरमसाठ पद्धतीने होत असलेली टोलवसुली आणि दुसऱ्याकडे अशा प्रकारचे प्रति टोल अथवा अपुऱ्या सुविधा दिल्या जात असतील, तर ते चुकीचे आहे. त्याचप्रमाणे इटकूर फाटा येथून कुंभारवाडी, साठेवाडी, सावरगाव अशा गावांना जाणाऱ्या लोकांना हटकने चुकीचे आहे. त्यामुळे जनआंदोलनाचा जो आंदोलनाचा इशारा हे तो लोकहिता साध्य करण्याचा आमचा प्रयत्न नाही असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.