Home » माझा बीड जिल्हा » संघटनांनी एकजूट दाखवावी -ह.भ.प.रामदासी

संघटनांनी एकजूट दाखवावी -ह.भ.प.रामदासी

संघटनांनी एकजूट दाखवावी -ह.भ.प.रामदासी

डोंगरचा राजा / आँनलाईन

– समाजाच्या प्रश्नासाठी सर्व संघटनांनी एकजूट दाखवावी-ह भ प भरत बुवा रामदासी

– ब्राम्हण महासंघाच्या पुरोहीत आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक कडेकर तर जिल्हाध्यक्षपदी राजेश बाभूळगावकर
बीड – समाज संघटित व्हावा त्यासाठी अनेक संघटना पुढाकार घेत आहेत असे असताना सामाजिक प्रश्नावर कुठल्याही संघटनांचं एक मत किंवा एकजूट झालेली दिसत नाही त्यामुळे सामाजिक प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून ब्राह्मण समाजाच्या प्रश्नासाठी ज्या संघटना कार्य करतील त्यांना आम्ही निश्चितच पाठबळ देऊ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांनी केले आहे
आज ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली पुरोहित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक कडेकर तर बीड जिल्हा अध्यक्षपदी राजेश बाभुळगावकर यांची निवड करण्यात आली

यावेळी ॲड कालिदासनाना थिगळे ,जेष्ठ पत्रकार नामदेवराव क्षीरसागर ,आनंद दवे (संस्थापक अध्यक्ष ब्राह्मण महासंघ ) ह भ प भरतबुवा रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आनिलदादा मनसबदार, पत्रकार प्रशांत सुलाखे,ॲड आजिक्य पाडंव बाळासाहेब आबेंकर, आनंद देवा जोशी, ॲड शार्दुल जोशी,उमेश काशीकर, आनिल महाराज निर्मळ,नितीन कुलकर्णी(हातोलकर)आदी उपस्थित होते
नूतन कार्यकारिणीत राजेश बाभुळगावकर (जिल्हाध्यक्ष )ब्राह्मण महासंघ, आप्पा कारीकर (जिल्हाध्यक्ष पुरोहित आघाडी ) आनिल महाराज निर्मळ (जिल्हा मार्गदर्शक )आनंद देवा जोशी (पुरोहित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष )योगेश जोशी (वडवणी )पुरोहित आघाडी तालुकाध्यक्ष आणि अशोक देवा कडेकर यांची प्रदेशाध्यक्ष (पुरोहित आघाडी )महाराष्ट्र प्रदेश म्हणुन नियुक्ती केली आहे
यावेळी भरतबुवा रामदासी म्हणाले कि ब्राह्मण समाजाला टारगेट करून अनेक कावळे सध्या काव काव करत आहेत समाजाला लक्ष्य करून पातळी सोडून टीका केली जाते आमचा समाज संख्येने कमी आहे ना मग टीका करता कशाला ? असा सवाल करत ब्राह्मण गुणवत्तेने मोठा होत असेल तर कावकाव करण्याची गरजच काय ?समाजातील गरीब कुटुंबांना संघटनांनी मदत करायला हवी सामाजिक प्रश्नावर आपला समाज अजूनही एकत्र यायला तयार नाही त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जर आपले प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास नाना थिगळे म्हणाले की समाजासाठी आणि समस्येसाठी समाज एकत्रीकरण होणे गरजेचे आहे समाजाच्या बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणावे लागेल राजकारण जरूर करावं परंतु ते समाजासाठी असायला हवं, भूमिका वेगळी असली तरी चालेल परंतु संघटन मजबूत असायला हवे संधीचा उपयोग समाजाने आता करून घ्यायला हवा जिथे कमी तिथे आम्ही आहोतच फक्त समाजाने एकजूट दाखवणे गरजेचे आहे असे ते म्हणाले
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नामदेवराव क्षीरसागर म्हणाले की, समाज एक विचाराने एकत्र आला तरच समस्या सुटण्यास मदत होईल अधिवेशनाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न समोर आले परंतु अधिवेशनाच्या पुढच्या काळात हा प्रवास थांबला आहे अनेक संघटना निर्माण होऊ लागल्या आहेत पण त्या एकत्रितपणे काम करत नाहीत अशी अवस्था आज निर्माण झाली आहे समाजाचा दबाव निर्माण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येणे गरजेचे असून ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज आजही आपल्याकडून मोठी अपेक्षा बाळगून आहे ती पूर्ण झाली पाहिजे असे ते म्हणाले यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की ब्राह्मण महासंघ हा विस्कळीत झालेला समाज एकत्रित करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे ग्रामीण भागात खूप मोठा जातीवाद सुरू असून याला विरोध करण्यासाठी मोठी ताकद उभी करावी लागेल स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी उशीर का होतो? असा सवाल करून सावरकरांवर जो टिका करतो तो महामूर्ख समजला जाईल ब्राह्मण महासंघ हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन करत असून गुणवत्ता आहे पण संघटन नाही त्यामुळे भविष्यात ही सामाजिक ताकद निर्माण करण्याची गरज असून मराठा समाज आमचा पालक आहे म्हणून आम्हाला कुणी बालक समजू नये असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला मानाचे स्थान दिले त्या राजाचे ऋण आम्ही कायम स्मरणात ठेवून असे सांगून त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या
प्रारंभी परशुराम सेवा संघाचे मराठवाडा मार्गदर्शक प्रशांत सुलाखे सावरकर प्रतिष्ठानचे अजिंक्य पांडव माजी नगरसेवक बाळासाहेब आंबेकर नितीन कुलकर्णी अशोक देवाकडे कर आनंद जोशी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published.