Home » महाराष्ट्र माझा » महामार्गावरील पथदिवे लागले – अँड.देशमुख

महामार्गावरील पथदिवे लागले – अँड.देशमुख

महामार्गावरील पथदिवे लागले – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – राष्ट्रीय महामार्गावर सुविधा न मिळताच टोल वसूल होत असल्याचे निदर्शनास आणून आंदोलन छेडण्याचा इशारा देताच पेंडगाव मधील दोन्ही बाजूने उभे असलेले खांबावरील दिवे टोल चालकांनी चालू केले आहेत. त्यामुळे पेंडगाव परिसर उजेडाने सुखावला असल्याचे चित्र निर्माण झाले असून आंदोलनाचा इशाऱ्याचे हे यश असल्याचे जनआंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

गेल्या एक ते दीड वर्षापासून या ठिकाणी दोन्ही बाजूने लावलेले खांब तसेच उभे होते. दिवे चालू नसल्याने पेंडगावकर तसेच तेथून जाणाऱ्या येणाऱ्यांची कुचंबणा होत होती. जनआंदोलनाने यावर आठ दिवसांपूर्वी आवाज उठविला होता आणि हे दिवे तात्काळ चालू करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता.

त्यानंतर टोलनाक्यावरून यासंदर्भात कारवाई चालू झाली आणि त्यामुळेच काही काळापुरते आंदोलन स्थगित केले होते. आता हे दिवे लागल्याने परिसर उजेडात आला आहे. या गावात हनुमान मंदिर प्रसिद्ध मंदिर असल्याने होत असलेली वाहतूक आणि रोडवर झालेल्या उजेड यातून वेगळी झळाळी मिळत आहे. त्यामुळे पेडगावकर देखील आनंदित झाले आहेत.

अन्य मागण्यांसंदर्भात पाठपुरावा चालूच आहे. मात्र कालचे आंदोलन काही काळापुरते स्थगित केले होते. त्यावरही पुढील सुविधा न मिळाल्यास विचार करावा लागेल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.