आ.क्षीरसागरांची अँड.देशमुख यांच्या कार्यालयाला भेट.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – बीड विधानसभा मतदारसंघाचे लोक प्रतिनिधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी हे उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर आणि अजित देशमुख यांची अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून लोकांची योग्य पध्दतीने सेवा झाली पाहिजे. प्रशासन आणि शासन या माध्यमातून सेवेची संधी आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून काम करा, चांगल्या कामात आमच्या शुभेच्छा रहातील, असे अँड. देशमुख यांनी क्षिरसागर यांना सांगितले.
सामान्य जनतेच्या अपेक्षा लहान – लहान असतात. ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी, रेशन माल, गॅसच्या टाक्या अशा किरकोळ किरकोळ गोष्टी प्रशासनातील दिरंगाईमुळे अथवा गैर प्रकारामुळे त्रासदायक ठरतात. सामान्य जनता हीच खरी दौलत आहे. शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
यावेळी मयूर देशमुख, अतुल कुलकर्णी, सय्यद आसदअली, तेजस कदम, अमोल घोलप, शुभम कुलकर्णी, रोहित जगताप यांचेसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.