Home » माझा बीड जिल्हा » टोल वसुली पण लाईट कायम बंद – अँड.देशमुख

टोल वसुली पण लाईट कायम बंद – अँड.देशमुख

टोल वसुली पण लाईट कायम बंद – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बीड तालुक्यातील धुळे – सोलापुर हायवे वर लावलेल्या लाईट एक वर्षापासून खांबासह उभ्या आहेत. मात्र त्या कायमस्वरूपी बंद आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारचे कृत्य करता येत नाही. मात्र संबंधितांचे दुर्लक्ष असल्याने टोल नाक्यावर टोल वसुली होत असतानाही या लाईट कायमस्वरूपी बंद असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. यासंदर्भात जन आंदोलनाने निवेदन दिले असून टोल नाक्यावर येत्या पंधरा डिसेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग धुळे – सोलापूर पेंडगाव येथून पुढे जातो. या महामार्गावर पेंडगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नियमाप्रमाणे लाईटचे खांब लावलेले असून त्यावर लाईट देखील बसवलेले आहेत. टोल वसुली करत असताना हायवे वरच्या गावाला सुविधा देणे गरजेचे होते. मात्र ही सुविधा न देता टोल वसुली चालू आहे. या गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वर्दळ आहे.

पेंडगाव येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध असून तेथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. या मंदिर परिसरात नालीचे काम झालेले असले तरी नालीवर भराव पुरता टाकलेला नसल्याने वाहने खाली उतरायला अडचण होत आहे. त्याचप्रमाणे गावात दोन्ही बाजूने खांब उभे असतानाही लाईट नसल्याने गावकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या लाईट दररोज लावल्या जाव्यात. यासाठी चे विद्युत कनेक्शन टोल प्रशासनाने ताबडतोब घ्यावे आणि येथील विद्युत रोषणाई ताबडतोब चालू करावी. नालीवरचा भराव पूर्ण करावा.

अन्यथा पंधरा डिसेंबर रोजीच्या आंदोलनस तोंड देण्यासाठी टोल नाका व आय. आर. बी. च्या अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.