Home » महाराष्ट्र माझा » पुण्यात सत्कार; लाखाची थैली भेट

पुण्यात सत्कार; लाखाची थैली भेट

पुण्यात सत्कार; लाखाची थैली भेट

डोंगरचा राजा / आँनलाईन

पुणे – पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांना एक लाखाची थैली देऊन मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तब्बल बारा वर्षे पत्रकारांचा लढा लढला गेला,अखेर 8 नोव्हेंबर रोजी राज्यात हा कायदा लागू झाला असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.हा कायदा व्हावा यासाठी एस.एम.देशमुख यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते देशमुख यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम पत्रकार भवन पुणे येथे सकाळी 10.30 वाजता होत आहे.यावेळी एसेम यांच्या खांदयाला खांदा लावून काम कऱणार्‍या किरण नाईक यांचाही गौरव होणार आहे.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेली वीस वर्षे राज्यात लढा सुरू आहे.एस.एम.देशमुख यांच्या लढयामुळे पत्रकार आरोग्य योजना,पत्रकार पेन्शन योजना,पत्रकार संरक्षण कायदा आदि विषय मार्गी लागले आहेत.राज्यात दररोज पत्रकारांवर हल्ले होत असत.याविरोधात मराठी पत्रकार परिषदेने राज्यभर लढा उभारला.अखेर 7 एप्रिल 2017 रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला.तो राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविला गेला. तब्बल अडीच वर्षांनी म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि 8 नोव्हेंबर रोजी हा कायदा गॅझेटमध्ये प्रसिध्द झाला.त्यासाठी देशमुख यांनी सातत्यानं संघर्ष केला,पाठपुरावा केला.महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे की,जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे.

हा कायदा व्हावा यासाठी देशमुख यांचे योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा एक लाख रूपयांची थैली,मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी मराठी पत्रकार परिषदेेचे विश्‍वस्त किरण नाईक यांचाही सन्मान करण्यात येणार आहे..या कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.