Home » माझा बीड जिल्हा » आता टोल नाक्यावर आंदोलन – अँड.अजित देशमुख

आता टोल नाक्यावर आंदोलन – अँड.अजित देशमुख

आता टोल नाक्यावर आंदोलन – अँड.अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– सुविधा न पुरवता पाडळसिंगी नाक्यावर टोल वसुली

– पंधरा डिसेंबर रोजी टोल नाक्यावर आंदोलन – अँड. अजित देशमुख

बीड – सोलापूर – धुळे या राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी येथे टोल नाका चालू करण्यात आलेला आहे. रस्त्याचे काम केलेले असल्याने टोलवसुलीला कुठलीही हरकत नाही. मात्र नियमाने ठरवून दिलेल्या सुविधा न देता होत असलेली टोल वसुली चुकीची आहे. त्यामुळे दहा डिसेंबर पर्यंत आवश्यक असलेल्या सुविधा पुरवाव्यात, अन्यथा पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पासून पुढे टोल नाक्यावर शांततापूर्ण रितीने आंदोलन केले जाईल, असा इशारा ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

पाडळसिंगी टोल नाक्यावरील कार्यालयात या संदर्भात जन आंदोलनाने दिनांक तिस डिसेंबर रोजी निवेदन देऊन असुविधा टोल नाका प्रशासनासमोर मांडल्या आहेत. ज्या परिसरासाठी टोल नाका चालू आहे, त्या परिसरामध्ये टोलनाक्यांना द्यावयाच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण झालेल्या आहेत. याकडे येथील प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.

प्रामुख्याने बीड बायपास जो औरंगाबाद कडे आणि बार्शी रोड कडे आहे, त्या रोडला आवश्यक असणारे आणि पुरेशी विद्दुत रोषणाई देणारे बल्प किंवा दिशादर्शक चिन्ह त्याचप्रमाणे रस्त्याच्या मध्ये लावलेले लाईट बंद असतात. त्यामुळे बायपासवर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नामलगाव, पेंडगाव, हिरापूर अशा ठिकाणी लाईटचे खांब लावले आहेत. हे खांब एकीकडचे चालू आणि दुसरीकडे बंद असतात. त्यामुळे असुविधांचा डोंगर या गावांमध्येही प्रामुख्याने दिसतो. विशेष म्हणजे पेंडगाव मधले दिवे लावल्यापासून एकदाही चालू नाहीत. वळणावर आणि चौकामध्ये साईड पट्टी अथवा मोठे दिवे आणि सिग्नल नेहमी चालू राहत नसल्याने अडचण निर्माण होते. यातून काही वेळेस अपघात घडले आहेत.

पेंडगाव येथील हनुमान मंदिर प्रामुख्याने हायवेवर असल्याने या मंदिर परिसरा जवळ नालीचे काम अर्धवट राहिलेली आहे. तेथे भराव टाकलेला नाही. त्यामुळे रस्त्यावर उभी राहणारी वाहने अडचण निर्माण करतात. येथे भराव नसल्याने लोकांना काहीच करता येत नाही. मंदिराच्या जवळ जागा असूनही वाहणे रस्त्यावर लावली जातात. रस्त्याचे काम करणारे संबंधित लोक जबाबदार आहेत.

ज्या ज्या ठिकाणी गाव, वळणे, आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी सिग्नल, साईड पट्टी, विद्युत रोशनाई, रस्त्यावर लावले जाणारे बल्प, अशा प्रकारची नियमाने ठरवून दिलेली पूर्ण यंत्रणा कार्यान्वित करावी. हिरापूर, नामलगाव, वगैरेंसारख्या गावांमध्ये रस्त्यावर लावलेले खांब आणि रत्याच्या दुतर्फा लावलेले बल्प हे कायम चालू असावेत. एका बाजूचे बल्प चालू आणि दुसऱ्या बाजूचे बंद अशा प्रकारचा प्रकार पुन्हा घडू नये.

नियमाने रस्त्यावर आवश्यक असलेल्या सर्व खुणा आणि दिशादर्शक चिन्ह पूर्णपणे व्यवस्थित करावेत. अन्यथा पंधरा डिसेंबर २०१९ रोजी रविवारी पाडळसिंगी टोल नाक्यावर सकाळी अकरा वाजता पासून आंदोलन केले जाईल. या आंदोलनाचे निवेदन टोलनाका प्रशासनाला पुन्हा दिले जाणार नाही. जिल्हा, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला याबाबत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल. असा इशाराही जन आंदोलनाने दिला असून हे आंदोलन अत्यंत शांततेत होईल, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

————-
* या आहेत असुविधा *
——————————-

* बायपासवर विद्युत रोषणाई नाही
* सिग्नल सारखे बल्प असतात बंद
* पेंडगाव नामलगाव हिरापूर दुर्लक्षित
* रस्त्यावरचे बल्प, खुणा चालू नाहीत
* दिशादर्शक बोर्डचा ठिकठिकाणीअभाव
* यामुळे रस्त्यावर होत आहेत अपघात
———–

Leave a Reply

Your email address will not be published.