Home » ब्रेकिंग न्यूज » समावेशित शिक्षण देणे गरजेचे – केंद्रप्रमुख डोईफोडे

समावेशित शिक्षण देणे गरजेचे – केंद्रप्रमुख डोईफोडे

समावेशित शिक्षण देणे गरजेचे – केंद्रप्रमुख डोईफोडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुसरून सर्व समावेशित शिक्षण देणे गरजेचे – केंद्रप्रमुख सुनिल डोईफोडे

– वडवणी केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

वडवणी – आपली शिक्षण प्रणाली ही बहुआयामी व सर्वसमावेशक अशी शिक्षण प्रणाली आहे. सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून भावी पिढी दर्जेदारपणे घडविण्याचे काम व जबाबदारी प्रत्येक शिक्षकांवर असते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपल्या जबाबदारीचे भान राखत शासन निर्देशानुसार विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना समजेल व उमजेल अशा सोप्या पद्धतीमध्ये अध्ययन अध्यापन करून त्यांच्या गरजा लक्षात घेता त्याला अनुसरून सर्व समावेशित शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वडवणी केंद्राचे कार्यतत्पर केंद्रप्रमुख सुनिल डोईफोडे यांनी सवासेवस्ती या ठिकाणी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुलांची वडवणी या वडवणी केंद्राची पाचवी मासिक शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासेवस्ती याठिकाणी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सवासेवस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर सवासे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वडवणी केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख सुनिल डोईफोडे व केंद्रीय मुख्याध्यापक भागवत घुले हे मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी संयोजकाच्या वतीने केंद्रातील सर्व घटक शाळांच्या मुख्याध्यापकांचे व सर्व शिक्षक बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सवासेवस्ती शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छान असे स्वागत गीत जाऊन मान्यवरांचे स्वागत केले. या शिक्षण परिषदेचे दोन मुख्य विषय होते. १) समावेशित शिक्षण दिव्यांग विद्यार्थी सहभाग याविषयी राजुदास राठोड सर यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले तर २) माहिती तंत्रज्ञान याविषयी प्रफुल्ल टकले सर यांनी उपस्थित गुरुजनांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. तदनंतर स्नेहभोजनाचा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात केंद्रप्रमुख सुनिल डोईफोडे तसेच केंद्रीय मुख्याध्यापक भागवत घुले यांनी शिक्षकांना काही सूचना तसेच मार्गदर्शन केले. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात ही मासिक शिक्षण परिषद सवासेवस्ती या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत खाटोकर सर यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुनिल डोईफोडे यांनी केले. तसेच शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मदन सवासे सर यांनी मानले. या परिषदेच्या यशस्वितेसाठी संयुक्तिक संयोजक असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासेवस्ती येथील सवासे सर व पवार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हापूर येथील मद्देवाड सर, केदार मॅडम व ठोंबरे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीपुर येथील खाटोकर सर व मुंडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धैसतांडा येथील बागे सर व सोनकांबळे मॅडम यासह आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.