Home » माझा बीड जिल्हा » शेतकऱ्यांनो ७/१२ देऊ नका – ॲड. अजित देशमुख

शेतकऱ्यांनो ७/१२ देऊ नका – ॲड. अजित देशमुख

शेतकऱ्यांनो ७/१२ देऊ नका – ॲड. अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अन्यथा पीक विमा मिळणार नाही

बीड – शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याचा वापर करून काही व्यापारी जिनिंग वर शेतकऱ्यांच्या नावाने कापूस घालत आहेत. या शेतकऱ्यांनी तात्काळ सावधानता बाळगावी. अन्यथा या शेतकऱ्यांना विम्याची कुठलीही रक्कम मिळणार नाही आणि विमा मिळण्यासाठी पात्रतेच्या यादीतून हे शेतकरी बाहेर जातील. त्यामुळे कापसाच्या लबाड व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांनी तात्काळ सावध व्हावे आणि आपला सातबारा या कामासाठी देऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
सध्या केंद्र शासनाच्या हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र चालू आहेत. भारतीय कापूस निगम नवी दिल्ली मार्फत कापूस खरेदीचे केंद्र चालू केलेले आहेत. या निगमने कापसाचा हमी भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये इतका जाहीर केला आहे. शेतकरी कापसाला जास्तीत जास्त भाव मिळावा आशावादी आहे.

सध्या गेवराई तालुक्यात सीसीआय खरेदी केंद्रामार्फत मार्फत फक्त व्यापाऱ्यांच्या कापूस खरेदी केला जातोय. हीच परिस्थिती जिल्ह्यात दिसत आहे. फार तुरळक प्रमाणात शेतकरी याचा लाभ घेताना दिसत आहेत. तरी पण व्यापाऱ्या मार्फत जवळ असणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावाने कापुस खरेदी साठी लागणारे सात बारा आणि आठ अ उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करून कमाल आणि किमान उत्पन्नावर आधारित निर्धारित क्षेत्रानुसार वीस क्विंटल ते चाळीस क्विंटल च्या खरेदीच्या पावत्या तयार केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना आणि बहुतांशी संबंधित असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जवळील शेतकऱ्यांना याची कसलीच कल्पना नाही. जिल्ह्यातील ओल्या दुष्काळी परिस्थिती मुळे जास्तीत जास्त उत्पन्न हे एकरी दोन ते अडीच क्विंटल पेक्षा जास्त नाही. परंतु व्यापारी जास्तीत जास्त दराचा फायदा उचलण्यासाठी संबंधित जवळच्या शेतकऱ्यांच्या नावावर तिस – तिस क्विंटलपर्यंत कापूस खरेदी केंद्रावर घालत आहे.

दुसरीकडे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांचे योग्य ते पंचनामे तयार होत आहेत. व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीच्या योजनेत शेतकऱ्यांच्या नावावर अशा पद्धतीचे जर कापूस नोंद करून घोळ घातला असे लक्षात आल्यास भविष्यात तो शेतकरी मिळणाऱ्या पीक विम्यापासून वंचित राहू शकतो. अशा पद्धतीने शेतकरी अनभिज्ञ राहून व्यापारी त्याचा फायदा उचलू शकतात.

शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा व्यापाऱ्यांकडून जर अशा प्रकारचा गैरप्रकार झाला आणि शेतकरी माहित असूनही गप्प बसला तर त्याचे प्रचंड नुकसान होणार आहे. एका अर्थाने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक असून या फसवणुकी मध्ये व्यापाऱ्यां बरोबर सीसीआय चे अधिकारी देखील सहभागी असल्याचे दिसून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घ्यावा. आपला कापूस आपल्या नावावर घालत असताना त्याची नोंद योग्य पद्धतीने करून घ्यावी आणि व्यापाऱ्यांच्या नादीं न लागता आपल्या सातबाराची खबरदारी घ्यावी, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.