Home » माझा बीड जिल्हा » पाटोद्यात संविधान दिन साजरा.

पाटोद्यात संविधान दिन साजरा.

पाटोदा संविधान दिन साजरा.

अमोल जोशी / पाटोदा

– शहरात विविध ठिकाणी साविधांन दिन साजरा.

पाटोदा येथे भीमनगर मध्ये भारतीय बौध्द महासभा शाखा पाटोदा च्या वतीने संविधान गौरव दिना निमित्त जेष्ठ नागरिक दे.मा. गुरुजी सेवा निवृत्त शिक्षक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन विद्यार्थ्यांना संविधान गौरव दिना निमित्त सविस्तर असे मार्गदर्शन केले. या निमित्ताने लहान विद्यार्थीनी किरण जावळे हिने “ संविधानाचं पुस्तक हातात, भिमराव बसले रथात” असे संविधानावर सुंदर गित सादर करुन उपस्थितांचे मने जिंकले. भारतीय संविधानामुळे आपल्या देशातील सर्व सामान्य , उपेक्षित समाजाला जगण्याचा अधिकार मिळाला असून आज आपण सर्व जन सुखसोई युक्त जीवन जगत आहोत. संविधानामुळे आज आमच्या अंगावर कपडे आहेत आम्ही सोन्याचा घास खात आहोत सर्व क्षेत्रा मध्ये स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. या वेळी संविधान गौरव दिनास आर. बी. जावळे, निलेश जावळे, संजय जावळे, प्रा. विजय जावळे, शांताबाई जावळे, विमल जावळे, शितल जावळे, आश्विनी जावळे, हे उपस्थित होते. या वेळी बौध्दाचार्य आयु. धम्मनंद जावळे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले. या वेळी संकेत जावळे, चेतन जावळे, वैभव जावळे, विकास जावळे, प्रणय सोनवणे, यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास बहुसंख्यने उपासक, उपासिका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.