Home » महाराष्ट्र माझा » डॉ.आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जगात आदर्श – बांगर

डॉ.आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जगात आदर्श – बांगर

डॉ.आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जगात आदर्श – बांगर

अमोल जोशी /पाटोदा

पाटोदा येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा, क्रांतीनगर, या शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रत्नाकरजी जायभाये व पाटोदा तालुका सहकारी दुधसंघाचे व्यवस्थापक श्री बांगर साहेब हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बांगर साहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर सर्व मान्यवर, विद्यार्थी, व शिक्षक यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या प्रसंगी बोलताना श्री. बांगर म्हणाले की, “जगातील सर्व राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची स्वतंत्र घटना लिहिली गेली व ती राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे.या संविधानाने आपल्याला योग्य प्रकारे जगण्याचा अधिकार दिला आहे .सर्व जातीच्या व धर्माच्या व्यक्तींना समान हक्क व अधिकार या संविधानाने दिला आहे.”
या प्रसंगी विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती मकाळ मॅडम यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले.मोरे सर यांनी संविधान तयार करण्याची प्रक्रिया व कालावधी याची माहिती दिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाण नईम यांनी नागरिकांचे हक्क व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार श्रीमती बडे मॅडम यांनी मानले.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती सानप मॅडम,श्रीमती भोसले मॅडम, गाढवे सर,भोसले सर, बोराटे सर,प्रकाश मामा सोनवणे यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published.