Home » माझा बीड जिल्हा » ह.भ.प.गायके बाप्पूराव महाराज अनंतात विलीन

ह.भ.प.गायके बाप्पूराव महाराज अनंतात विलीन

ह.भ.प.गायके बाप्पूराव महाराज अनंतात विलीन

अमोल जोशी / पाटोदा

-अंत्यसंस्काराला जनसागर लोटला.

शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथिल सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. गायके बाप्पूराव विठोबा महाराज यांचे वृधापकाळाने राहत्या घरी दि २४ नोव्हेंबर रवीवार रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी १०१ वर्षे वय होते. त्यांनी आतापर्यंत १००० हजाराच्या वर किर्तन सेवा केल्या आहेत. त्यांनी गावागावात सप्ताहा सुरु केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात ह.भ.प.गायके महाराज यांच्या शताब्दी पूर्ती वर्षा निमित ह.भ. प. स्वरगंध संगीताताई सोळसकर व ज्ञानेश्वर सोळसकर व पाटोदा येथिल महाराजांचे चाहते पञकार छगन मुळे यांच्या आयोजनातून व जाटनांदूर पंचक्रोशी तील भजनी मंडळ तसेच अनेक गावांच्या सहकार्यातून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह घेऊन गायके महाराज यांच्या डोळ्या देखत त्यांच्या सांप्रदायिक कार्याचे कौतुक करण्यात आले होते.
संत श्री वामनभाऊ महाराज यांच्या सानिध्यात असल्याने गायके महाराज यांना संत वामानभाऊ महाराज यांनीच कीर्तन करण्याची सुरुवात करून दिली होती. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांच्या जाण्याने जाटनांदूर परिसरातील भक्तगण व त्यांच्या कुंटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्यात एक मुलगा, दोन मुली, जावई, नांतवंडे असा मोठा परिवार आहे. शास्त्रीय गायक पांडूरंग गायके यांचे ते वडील होत. दि २५ रोजी सोमवारी सकाळी ९ वाजता टाळ मृदांगाच्या गजरात अत्यंयाञेला सुरुवात झाली. सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
यावेळी जिल्ह्यासह जाटनांदूर परिसरातिल ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बाप्पू , ह.भ.प. दहिफळे महाराज, ह.भ.प. सतिश महाराज, , जि.प् सदस्य रामदास बडे, माऊली जंरागे, माजी जि.प सदस्य दशरथ वनवे, माजी सभापती सुनिल चौधरी, माजी सभापती बेदरे सर, सरंपच हानुमंत डोंगर, उपसरपंच बबन काटे, सुंदर जेधे, डॉ रवींद्र गोरे , डॉ राऊत , यांच्यासह सामाजिक, राजकीय, डॉ, वकील, भजनी ,भक्त व बीड जिल्ह्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published.