Home » ब्रेकिंग न्यूज » महाराष्ट्र सत्तासंघर्ष;सुप्रीम कोर्ट उद्या देणार निकाल

महाराष्ट्र सत्तासंघर्ष;सुप्रीम कोर्ट उद्या देणार निकाल

महाराष्ट्र सत्तासंघर्ष;सुप्रीम कोर्ट उद्या देणार निकाल

डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तापेच प्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. उद्या सकाळी १०.३० वाजता कोर्ट निकाल सुनावण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली. या शपथविधीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर काल आणि आज सुनावणी झाली. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे जी कागदपत्रे सादर करण्यात आली ती आज सुप्रीम कोर्टाकडे सोपविण्यात आली. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. यावर उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे.
आज दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज, या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारकडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांच्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर केली. तसेच राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्याकडून राज्यपालांना २२ नोव्हेंबर रोजी मिळालेले ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र देखील कोर्टात सादर करण्यात आले. आपण (अजित पवार) राष्ट्रवादीचा गटनेता असून आपल्याला सगळ्या ५४ आमदारांचा पाठिंबा आहे, असा अजित पवारांच्या पत्रातील मजकूर आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणारे राज्यपालांचे पत्रही खंडपीठाकडे सोपविण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे समर्थन आहे. भाजपचे १०५ आणि राष्ट्रवादीचे ५४ आमदार असून फोडाफोडाचा प्रश्नच येत नाही. सर्व पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यपालांनी वेळ दिल्यावर वाट पाहिली. राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला वेळ दिला, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी कोर्टात केला.

काँग्रेस- राष्ट्रवादीची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनी, आम्ही सभागृहात विश्वासदर्शक ठराव हरायला तयार आहोत, मात्र तरीही ते (भाजप) बहुमत चाचणी घ्यायला तयार नाहीत, असे सांगितले. त्यांनी यावेळी १५४ आमदारांच्या सह्यांच्या पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. आमदारांच्या सह्यांचे पत्र चुकीच्या हेतून वापरण्यात आले. ते पत्र वेगळ्या कारणांसाठी तयार करण्यात आले होते. मात्र त्याचा दुसरीकडे वापर करण्यात आला. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार असताना विलंब का केला जातोय? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. राज्यपालांनी अचानक एका रात्रीत घाई का केली?, असा सवाल सिब्बल यांनी केला

Leave a Reply

Your email address will not be published.