Home » माझा बीड जिल्हा » दारूड्यांची संख्या वाढवू नका – अँड.अजित देशमुख

दारूड्यांची संख्या वाढवू नका – अँड.अजित देशमुख

दारूड्यांची संख्या वाढवू नका – अँड.अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– जिल्ह्यात पंचावन्न नवीन दारू दुकाने मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

बीड – कायद्याने जरी दारू दुकाने मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीतील समितीला मंजुरी दिलेली असली, तरी देखील नैतिकता समोर ठेवून जिल्ह्यात दारुड्यांची संख्या वाढू नये आणि कौटुंबिक वातावरणाची वाताहत होऊ नये, यासाठी बीड जिल्ह्यात नवीन दारू दुकानांना मंजुरी देऊ नका. सामाजिक शांतता अबाधित ठेवून आत्महत्या वाढीसाठी जबाबदार ठरू नका, अशा प्रकारचे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

बीड जिल्ह्यात यापूर्वी शेकड्यावर दारू दुकाने मंजूर झालेली आहेत. हा आकडा सहाशेच्या घरात आहे. असे असतानाही आणखी दारू दुकाने मंजूर होत असल्याबाबतची खात्रीलायक माहिती जन आंदोलनाला प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे एक दुकान मंजूर करून घेण्यासाठी पाच लाखाचा खर्च येत असल्याची गंभीर चर्चा ऐकायला मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात तीस नवीन बियर बार चे प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात नवीन बावीस बिअर शॉपीचे प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आलेले आहेत, असेही समजते.

यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी मुळे तिथून स्थलांतरित होणारी दुकाने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न होत असून अशा प्रकारचे एक दुकान नेकनुर येथे आल्याचे समजते. नेकनूर येथे यापूर्वीच चार बियर बार दोन बिअर शॉपी आणि एक देशी दारू दुकान असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम ग्रामपंचायतींनी स्थलांतरित होऊन बीड जिल्ह्यात येणाऱ्या दारू दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये.

ज्या ग्रामपंचायतींनी बियर बार बियर शॉपी आणि स्थलांतरित होऊन येणारे देशी दारूचे दुकान यांना गावाची संमती न घेता अथवा ग्रामसभा न घेता परस्पर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संमती दिली असेल आणि बोगस ठरावाचा आधार घेतला असेल तर त्या गावातील लोकांनी रीतसर ग्राम पंचायतीची सभा म्हणजेच ग्रामसभा बोलावून अशा प्रकारचा दिलेला बोगस ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील तमाम महिला आणि भगिनींना जन आंदोलनाची विनंती की, अशा प्रकारचे कुठलेही नवीन दुकान मंजूर होऊ नये, यासाठी आपण रस्त्यावर उतरावे महिलांच्या आंदोलना शिवाय दारूबंदीचे आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही.

त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी आपापल्या भागातील दारू दुकाने वाढणार नाहीत. यासाठी लक्ष द्यावे आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी दोन हात करावेत, असे आवाहनही अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.