Home » माझी वडवणी » बाबरी मुंडे मित्र मंडळाची शहीद जवान जाधवर कुटुंबास आर्थिक मदत

बाबरी मुंडे मित्र मंडळाची शहीद जवान जाधवर कुटुंबास आर्थिक मदत

बाबरी मुंडे मित्र मंडळाची शहीद जवान जाधवर कुटुंबास आर्थिक मदत

– सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी बाबरी मुंडे यांचा वाढदिवस साजरा

वडवणी – रक्तदानाच्या महायज्ञानंतर माजलगाव मतदार संघातील भाजपाचे कर्तुत्ववान युवानेते बाबरी मुंडे यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधत भारत मातेसाठी शहीद झालेले शहीद जवान परमेश्वर जाधवर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी बाबरी मुंडे मित्र मंडळ यांच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचबरोबर वडवणी तालुक्यात व संपूर्ण माजलगाव मतदार संघात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी लाडके युवा नेतृत्व बाबरी मुंडे यांचा वाढदिवस कोणताही मोठा लवाजमा न करता अत्यंत साधेपणाने सामाजिक दायित्वातून साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे लाडके युवा नेतृत्व तसेच हजारो तरुणांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे कर्तुत्ववान कुशल खंबीर नेतृत्व युवा नेते बाबरी सेठ मुंडे यांचा वाढदिवस केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्याचा संकल्प सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतकांनी केला होता आणि अगदी त्याला साजेसा असा हा वाढदिवस कोणताही मोठा लवाजमा न करता अत्यंत साधेपणाने परंतु मोठे सामाजिक दायित्व निभावत वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्याने विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक अशा ५११ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा हा महायज्ञ मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवला. त्याचबरोबर काल दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ या वाढदिवसादिनी देशसेवेसाठी नुकतेच आपले बलिदान देऊन शहीद झालेले धारुर तालुक्यातील घागरवाडा येथील शहीद जवान परमेश्वर जाधवर या शहीद जवानाच्या कुटुंबियांची बाबरी मुंडे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जाधवर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शहीद जवान यांच्या मुलींच्या शिक्षणाकरिता रोख ५१ हजार रुपये आर्थिक मदत देत सामाजिक दायित्व निभावले. याप्रसंगी स्वतः बाबरी मुंडे, युवा नेते राजेभाऊ मस्के, सरपंच रामेश्वर भाऊ जाधव, नगरसेवक महादेव भाऊ जमाले, प्रेमदास राठोड, राजेभाऊ पवार, संजय तात्या उजगरे, जावेद पठाण, सुग्रीव मुंडे, प्रकाश सोनटक्के, सचिन सानप, महादेव बाप्पु शेंडगे, महादेव बप्पा शेळके, बाळराजे शिंदे, नितीन जैन, विक्रम बप्पा बडे, अशोकराव नागरगोजे, मुन्ना बडे, धनराज मुंडे, समाधान गोबरे, गजानन मस्के, संतोष बहिरे, माऊली सव्वासे, अनिल मस्के यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर वडवणी तालुक्यात व तसेच संपूर्ण माजलगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप, महिलांना साड्यांचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण यासह इतर अभिनव सामाजिक उपक्रमातून सर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांनी या आपल्या लाडक्या युवानेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अगदी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत राजकीय, सामाजिक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, मेडिकल, पत्रकार यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व बाबरी मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो तरुण युवकांनी बाबरी मुंडे यांना वाढदिवसाच्या अनमोल अशा शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.