बाबरी मुंडे वाढदिवस; महा रक्तदानातून नवा विक्रम
डोंगरचा राजा / आँनलाईन
– रक्तदानाच्या महायज्ञात नवा उच्चांक
– रेकॉर्ड ब्रेक ५११ रक्तदात्यांनी महा रक्तदानातून नवा विक्रम प्रस्थापित केला.
वडवणी – माजलगाव मतदार संघातील भाजपाचे लाडके युवा नेतृत्व बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात काल दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ गुरुवार रोजी आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये तब्बल ५११ रक्तदात्यांनी रक्तदान करून बीड जिल्ह्यातील रक्तदानाच्या क्षेत्रात एका नव्या महाविक्रमाला गवसणी घातली असून या निमीत्ताने रक्तदानाच्या या महायज्ञात नव्या उच्चांकाची नोंद सुवर्णाक्षराने निश्चीतच झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गतवर्षी कोरड्या भयानक दुष्काळानंतर यंदाही अवघ्या महाराष्ट्राला निसर्गाच्या लहरीपणामुळे ओल्या दुष्काळाने होरपळून टाकले आहे. या अशा गंभीर परिस्थितीचे भान राखत माजलगाव विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सक्षम व कर्तुत्ववान युवा नेतृत्व तसेच बीड जिल्हा बँकेचे युवा संचालक हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत युवा नेते बाबरीसेठ मुंडे यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी साजरा होणाऱ्या आपल्या वाढदिवसाचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा, स्वागत सत्कार कार्यक्रम, हार-तुरे, फटाकेबाजी, बॅनर असे सर्व कार्यक्रम रद्द करीत हा वाढदिवस केवळ रक्तदान शिबीराच्या माध्यमातूनच साजरा करण्याचा संकल्प त्यांनी व त्यांच्या सर्व हितचिंतकांनी करीत समाजासमोर पुनश्च एकदा आदर्श निर्माण केला होता. त्या अनुषंगाने बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काल दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ रोजी वडवणी शहरातील नुतन व्यापारी संकुल, बाजारतळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी भव्य अशा महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराच्या उदघाटनप्रसंगी भाजपाचे नेते रमेशराव आडसकर, स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, कार्यसम्राट नगराध्यक्ष राजाभाऊ आण्णा मुंडे, ज्येष्ठ नेते सोमनाथराव बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महादेव रेडे, परमेश्वर उजगरे, सुग्रीव मुंडे, मच्छिंद्र झाटे, डॉ.उमेश करमाळकर, नगरसेवक शेषेराव जगताप, संजय उजगरे, विनय नहार, शिवाजी टकले, इस्माईल पठाण, राजेभाऊ पवार, प्रेमदास राठोड, किसन राठोड, माजी सरपंच महादेवराव शेंडगे, महादेव शेळके, विक्रम बडे, मुन्ना बडे, अशोक नागरगोजे, ईश्वर नाईकवाडे, रामेश्वर जाधव, गजानन निपटे, बद्रीनाथ साबळे, प्रकाश सोनटक्के, नितीन जैन, सचिन सानप, जावेद पठाण, भारत मायकर, महेश खुपसे, सुमंत भांगे, बाबू गुरसाळी, बाळू शिंदे, सतीश गाडे, नितीन उजगरे, समाधान उजगरे यांसह इतर असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदघाटनानंतर लागलीच महारक्तदानास सुरुवात करण्यात आली. दिवसभरामध्ये रक्तदात्यांची मोठी रांगच रांग यावेळी पहावयास मिळाली. या महारक्तदान शिबीरामध्ये तब्बल ५११ रक्तदात्यांनी रक्तदान करून बीड जिल्ह्यातील रक्तदानाच्या क्षेत्रात एका नव्या महाविक्रमाला गवसणी घातली असून रक्तदानाच्या या महायज्ञात नव्या उच्चांकाची नोंद सुवर्णाक्षराने निश्चीतच झाली आहे. गतवर्षी वाढदिवसानिमित्त आयोजित अशाच महारक्तदान शिबीरामध्ये तब्बल ४०५ रक्तदात्यांनी एकाच वेळी एकाच रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करून बीड जिल्ह्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला होता. आपलाच हा विक्रम यावर्षी मोडीत काढून बाबरी मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या तब्बल ५११ रक्तदात्यांनी यावर्षी पुनश्च एकदा बीड जिल्ह्याच्या रक्तदान क्षेत्रामध्ये नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे. या नव्या विक्रमाबद्दल बाबरी मुंडे मित्रमंडळाचे संपूर्ण जिल्हाभरात कौतुक व अभिनंदन होत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करून हे महारक्तदान शिबीर पुनश्च एकदा नव्या विक्रमाने यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल युवा नेते बाबरी मुंडे यांनी सर्व ५११ रक्तदात्यांचे, बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण विभागाचे व आपल्या मित्र परिवाराचे शेवटी आभार मानले.