Home » ब्रेकिंग न्यूज » वडवणी येथील गुलाबचंद नहार यांचे निधन

वडवणी येथील गुलाबचंद नहार यांचे निधन

वडवणी येथील गुलाबचंद नहार यांचे निधन

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी / प्रतिनिधी
वडवणी येथील ख्यातनाम असलेले गुलाबचंद पन्नालाल नहार यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले वृद्धापकाळ आणि आजारपणाने निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या म्हणजे सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी दहा वाजता वडवणी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात अशोक कुमार, विजयकुमार आणि प्रेमचंद अशी तीन मुले, सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ते वडवणी तालुक्यात प्रसिद्ध होते.त्यांच्या निधनामुळे वडवणी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.