Home » माझा बीड जिल्हा » निविदा निघाली;जनतेने लक्ष ठेवावे – अँड.अजित देशमुख

निविदा निघाली;जनतेने लक्ष ठेवावे – अँड.अजित देशमुख

निविदा निघाली;जनतेने लक्ष ठेवावे – अँड.अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

चौऱ्यांशी किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी सत्तावन्न कोटी रुपये मंजुर – अँड.अजित देशमुख

बीड – जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झाले असून या पैशातून चौऱ्यांशी किलोमीटर रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे. चुंबळी फाटा ते राजुरी फाटा, जरुड फाटा ते वडवणी, वडवणी ते तेलगाव आणि तेलगाव ते शिरसाळा या चार टप्प्यांमध्ये या रस्त्याच्या कामाची विभागणी करण्यात आली असून जनतेने हे काम चांगले होते किंवा नाही याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक माननीय अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

चुंबळी फाटा ते राजुरी फाटा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या रस्त्यावर चाळीस किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी चोवीस कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे एकोणवीस किलोमीटरच्या अंतरासाठी अकरा कोटी सहासष्ट लाख रुपये, वडवणी ते तेलगाव या पंधरा किलोमीटर अंतरासाठी आठ कोटी नव्यान्नव लाख तर तेलगाव ते शिरसाळा या वीस किलोमीटर रस्त्यासाठी अकरा कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करून करण्यात येणार असून यावरील डीबीएम थर पन्नास एम. एम. जाडीचा टाकण्यात येईल. तर कार्पेट थर तीस एम. एम. जाडीचा टाकण्यात येणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे वडवणी च्या पुढील बावी तांडा येथे अनेक वेळेस अपघात झालेले आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्याचे काम मुळातच निकृष्ट झालेले असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तरीही जनता हे काम सहन करत आलेली होती. राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी या कामाचे टेंडर निघाले असून टेंडर भरण्याचे काम सध्या चालू आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश दिला जाईल. डांबरीकरणाचे कामामुळे या रस्त्याने जाणाऱ्या लोकांची सोय होईल. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले हे काम बंद झाल्याने जनतेला चांगल्या रस्त्याचा अनुभव घेता येईल. या होणाऱ्या रस्त्याच्या कामावर त्या त्या भागातील जनतेने लक्ष ठेवले पाहिजे. लक्ष नसेल तर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन जनतेचा पैसा वाया जाणार आहे.

बीड जिल्ह्यात रस्त्याच्या कामाची वाट लावून आपले खिसे भरणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच मूठभर लबाड लोकांमुळे लाखो लोकांना त्रास होत असतो. या मूठभर लोकांना जागेवर आण्यासाठी जनता रस्त्यावर येत नाही ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या कामाकडे प्रशासना बरोबरच जनतेनेही लक्ष ठेवावे, असे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.