Home » माझी वडवणी » जिल्हा प्रशासनाचा थेट ग्रामस्थांशी “संवाद”

जिल्हा प्रशासनाचा थेट ग्रामस्थांशी “संवाद”

जिल्हा प्रशासनाचा थेट ग्रामस्थांशी “संवाद” 

डोंगरचा राजा / आँनलाईन

-जिल्हाधिकारी, सीईओ, एस.पी. यांची सुट्टीच्या दिवशी मांडवजाळीस भेट

– जि. प. शाळा, गावाची केली पहाणी
– ग्रामस्थाकडून जाणून घेतल्या अढचणी
– समस्या सोडविण्याचे संबंधितांना केल्या सूचना
– पिण्याच्या पाण्याच्या टाकी व फील्टरचे उद्घाटन

संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत दि. 17 नोव्हेंबर 2019 रोजी म्हणजेच रविवारी चक्क सुटीच्या दिवशी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडनजीकच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट दिली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या या संकल्पनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आनंदाने होकार देत, लगेचच हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला.
या तिन्ही अधिकाऱ्यांनी मांडवजाळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी जिल्हा परिषद शाळेसह प्रत्यक्ष गावामध्ये फिरून विविध भागाची पाहणी केली व वयोवृद्ध महिलां कोंडाबाई बहीरवाळ, चंद्रभागा भंडाणे, तुळसाबाई जाधव, नंदा बहिरवाळ यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच मांडवजाळीच्या अन्य ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील विविध प्रश्न जाणून घतले व ते सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, या मान्यवरांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याची टाकी व जल शुद्धीकरण यंत्रणेचे (फिल्टर) फित कापून उद्घाटन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांचे पिता हृदयराम पाण्डेय, माता श्रीमती कल्पना पाण्डेय, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माता ज्योत्सना पोद्दार, मांडवजाळीचे सरपंच दादासाहेब बहिरवाळ, उपसरपंच अर्जुन चंदेल, पोलीस पाटील काशिनाथ पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी म्हणजे अख्खे जिल्हा प्रशासनच सुटीच्या दिवशी मांडवजाळी येथे आल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमास मंडळ अधिकारी अरविंद गायकवाड, तलाठी मीनल खांदे, ग्रामसेवक गणेश जाधाव, माजी उपसरपंच हनुमान बहिरवाळ, बापू बहिरवाळ, विठ्ठलराव सुभाष बहिरवाळ, संजय बहिरवाळ, नामदेव वायकर, अर्जुन येवले, नाना बहिरवाळ,गणेश विर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.