Home » महाराष्ट्र माझा » संत विचाराचा नंदादीप तेवत ठेवा. हभप रामदासी

संत विचाराचा नंदादीप तेवत ठेवा. हभप रामदासी

संत विचाराचा नंदादीप तेवत ठेवा. हभप रामदासी

डोंगरचा राजा / आँनलाईन

केज – आज समाज जीवनात विकाराचे आणि विचाराचे प्रदुषण प्रचंड प्रमाणात होत आहे. माणूस फक्त पैशाच्याच मागे रात्रंदिवस धावत आहे. त्याला असे वाटते पैसाच सर्व सुखाचे कारण आहे. पैसा सर्व काही करतो, असं समजणारी माणसे पैशासाठी सर्व काही करतात. त्यामुळे आज विचारातच प्रदुषण निर्माण झाले आहे. या प्रदुषणा पासून वाचण्यासाठी संत विचारांचा नंदादीप सतत तेवत ठेवण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन बीड येथील प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प भरतबुवा रामदासी यांनी केले. ते मौजे येवता ता. केज येथील अखंड हरिनाम सप्ताहात बोलत होते. हभप पांडुरंग महाराज इनामदार गुरूजी यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यातील कीर्तन मालेत बोलतांना ह.भ.प भरतबुवा रामदासी पुढे म्हणाले की; प्रत्येक जीवाला सुख मिळालेच पाहिजे पण अन्याय मार्गाने नको. पत्नी, धन, मुलगा,प्रपंच या पासून मिळणारे सुख अशाश्वत असते. संत कधीही अशाश्वत सुखाच्या मागे धावत नाहीत. भक्ती मार्ग हाच शाश्वत सुखाचा मार्ग आहे. संतांनी समाज जीवनात भक्ती मार्गाची शिकवण दिली. म्हणून संत विचारांची पणती सतत तेवत ठेवण्याची गरज आहे. भागवताचार्य लक्ष्मणमहाराज इनामदार यांनी हभप भरतबुवा रामदासी यांचा भावपूर्ण सत्कार केला. कार्यक्रमासाठी श्रोतृवंदाची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर महाराज इनामदार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.