Home » माझी वडवणी » पिक विमा नुकसानग्रस्तचे पुर्नसर्वे रद्द करा – राष्ट्रवादी

पिक विमा नुकसानग्रस्तचे पुर्नसर्वे रद्द करा – राष्ट्रवादी

पिक विमा नुकसानग्रस्तचे पुर्नसर्वे रद्द करा – राष्ट्रवादी

डोंगरचा राजा / आँनलाईन

– शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा देण्यात यावा

वडवणी –

वडवणी तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके वाहून जाऊन शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामध्ये पिके वाहून व कुजून गेली आहेत.सदरील घटनेला महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे शेतात काहीही शिल्लक नसून पिक विमा नुकसान भरपाईचा पुर्वसर्वे जो सुरू केला आहे तो तातडीने बंद करण्यात यावा व शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी वडवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली असून तहसीलदार यांच्याकडे रितसर निवेदन ही सादर केले आहे.

वडवणी तालुक्यामध्ये गत काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके वाहून जाऊन 100 टक्के नुकसान झाले.तसेच शेतातील पिके वाहून गेले,काही प्रमाणात कुजूनही गेली.या घटनेला महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे शेतामध्ये काही सुद्धा शिल्लक नाही. मग पंचनामे करणार कशाचे..? शासन,प्रशासनाने सदरील पंचनामा व पाहणी करण्यास अक्षम्य विलंब लावला असून अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जाचक अटी लादल्या जाऊ लागल्या आहेत. त्यांना एक तर विम्यापासून वंचित ठेवण्याचे पाप विमा कंपनी करत तर नाही ना..? हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी वडवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे पुर्नसर्वे रद्द करून पीक विमा व शासकीय अनुदान तात्काळ देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदनही तहसीलदार वडवणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी औदुंबर सावंत,बजरंग साबळे,संदिपान खळगे, भास्कर मुंडे, सतीश बडे, किसन महागोविंद, रामनाथ देशमुख सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.