Home » महाराष्ट्र माझा » गावंदर-याच्या सुनेने फडकावला देशात झेंडा

गावंदर-याच्या सुनेने फडकावला देशात झेंडा

गावंदर-याच्या सुनेने फडकावला देशात झेंडा

डोंगरचा राजा / आँनलाईन

एम.डी.रेडिओलॉजी परीक्षेत देशात प्रथम, मिळवले गोल्ड मेडल

किल्ले धारूर – धारूर तालुका हा डोंगराळ भागाचा असून या तालुक्याने अनेक अधिकारी या देशासाठी दिलेले आहे.या तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण चांगले आहे.त्यामुळे शिक्षणचा दर्जा सुद्धा चांगला आहे.धारूर तालुक्यातील गावंदरा गावातील शिवाजीराव बाबू बडे यांची सून तर डॉ.अरुण शिवाजीराव बडे (डी.एम.कारडीओलोंजीस्ट) यांची पत्नी डॉ. मधुरा बडे यांनी गावासह जिल्ह्याची मन उंचावली आहे.त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूल मधून पूर्ण केले तर एम.बी.बी.एस.चे शिक्षण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन अहमदनगर येथून पूर्ण केले आहे.तर पद्युत्तर शिक्षण बॉम्बे हॉस्पिटल इंदोर या ठिकाणी पूर्ण केले.या शिक्षणासाठी त्यांचा देशातून प्रथम क्रमांक आलेला आहे.त्यांना गोल्ड मिडल सुद्धा मिळाले आहे.त्यांचे पाती डॉ.अरुण बडे यांचे शिवाजीराव हार्ट केअर इमेजिंग सेंटर संतोषीमाता चित्र मंदिराजवळ चालू आहे.त्यांचा सुद्धा डी.एम. कारडीओलोंजीस्ट या अभ्यासक्रमामध्ये राज्यात दुसरा क्रमांक आलेला होता.यांव्हा यशाबद्दल त्याचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.