Home » माझी वडवणी » पंकजाताई उत्तुंग झेप घेणारच-मा.आ.देशमुख

पंकजाताई उत्तुंग झेप घेणारच-मा.आ.देशमुख

पंकजाताई उत्तुंग झेप घेणारच-मा.आ.देशमुख

डोंगरचा राजा/आँनलाईन

– फिनिक्स पक्षा प्रमाणे पंकजाताई उत्तुंग झेप घेणारच-मा.आ.देशमुख

– प्रकृती पूर्वपदावर येताच जिल्ह्यात भाजप संघटन वाढी साठी झोकून देऊन कार्य करणार

माजलगाव – सध्या प्रकृती अस्वस्था मुळे मी उपचार घेत असून प्रकृती पूर्वीप्रमाणे पूर्वपदावर येताच बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढी साठी व पंकजाताई मुंडे करिता झोकून देऊन कार्य करणार आहे,केवळ एका पराभवाने पंकजाताई खचणाऱ्या नसून त्या फिनिक्स पक्षा प्रमाणे झेप घेणाऱ्या आहेत असे प्रतिपादन माजी आमदार आर टी देशमुख यांनी केले

माजी आमदार आर टी देशमुख सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत आहेत उपचार सुरू असतानाही व डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली असतानाही आज मा आ आर टी देशमुखांनी फोन वर पंकजाताई यांच्या सोबत संवाद केला विडिओ कॉल वरती जिजांना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता केवळ पंकजाताई व भाजप संघटन वाढी साठी त्यांची असलेली कडवट निष्ठा व भविष्यातील नियोजन पाहून अनेकांना गहिवरले परळी मतदारसंघात पंकजाताई यांचा झालेल्या पराभावामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे, माजी आमदार आर टी देशमुख यांच्या आज फोन वरील संभाषनामुळे तसेच त्यांनी दाखविलेल्या दुर्दम्य ईच्छा शक्तीच्या ताकदीने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला असून केवळ एका पराभवाने पंकजाताई खचणाऱ्या नाहीत त्या पुन्हा फिनिक्स पक्षा प्रमाणे उत्तुंग राजकीय झेप घेतील त्या करिता प्रकृती पूर्वपदावर येताच पुन्हा जिल्ह्यातील गावागावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार आर टी देशमुख यांनी केले दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी जिजांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून ते लवकर पुन्हा सक्रिय व्हावेत अशी कामना केली.

Leave a Reply

Your email address will not be published.