Home » महाराष्ट्र माझा » प्रतिष्ठानचे कार्य समाजाच्या हिताचे – डॉ.थोरात

प्रतिष्ठानचे कार्य समाजाच्या हिताचे – डॉ.थोरात

प्रतिष्ठानचे कार्य समाजाच्या हिताचे – डॉ.थोरात

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

– गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्यावतीने सिरसमार्गसह 11 गावातील 200, भूमिहिन, गरजू, विधवा व अपंगांना केले मोफत किराणा सामानाचे वाटप

बीड – समाजाच्या भल्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या अडीअडचणींना नेहमीच धावून येत, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान सतत विविध उपक्रम राबवून त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असते. या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. सिमा मनोज ओस्तवाल यांनी हाती घेलेले व्रत हे समाजाच्या हिताचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले. दिवाळी सणाच्यानिमित्त गोरगरीबांची दिवाळी आनंद साजरी व्हावी या हेतूने गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्यावतीने दि. 26 ऑक्टोंबर 2019 रोजी गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ग्रामदैवत संतुआई मंदिर सभागृह येथे 10 गावातील जवळपास दोनशे भूमिहिन, गरजू, विधवा व अपंग कुटूंबांना मोफत किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा शल्यचिकीत्स डॉ. अशोक थोरात हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यटन विकास महामंडळाचे संचालक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास भाजपाचे शिवराज पवार, पं.स.सदस्य अनिलकाका पवळ, शांतीवनचे प्रकल्प संचालक दीपकराव नागरगोजे, सरपंच कैलास नलावडे, सरपंच शिवाजी नलावडे, भारत तांबारे, पांडुरंग कोळेकर, बप्पा तांबारे, गणपत पाबळे, शरद तांबारे, पांडुरंग कारांडे, डॉ. मनोज ओस्तवाल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. अशोक थोरात म्हणाले की, गुरु आनंद महिला प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमी विविध उपक्रम राबवून समाजातील वंचित घटकांना पुढे येण्याची संधी दिली आहे. सौ. सिमा ओस्तववाल यांनी आयोजित केलेल्या एक-दोन कार्यक्रमांना मी उपस्थित होतो. गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे महिला व मुलींचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देते तसेच दर वर्षी समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करते तसेच दिवाळी सणाच्या निमित्ताने खर्‍या गरजुंना मोफत किराणा साहित्य देवून त्यांची दिवाळी आनंदात व गोड साजरी करते याच मला खरच आभिमान वाटत आहे, प्रतिष्ठानने आपल्या कार्याची व्याप्ती आणखी मोठी करावी त्यासाठी आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने मी देखील प्रतिष्ठानला गरज पडल्यास शक्य ती मदत करेल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पोकळे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. गरीबांची दिवाळी आनंदात गोड करत याच बरोबर समाजात शिक्षण व पाणी या विषयावर जनजागृती करुन समाजोपयोगी कार्यक्रम हाती घ्यावेत या कामासाठी आपण सर्वप्रकारची मदत करुत तसेच संतुआई मंदिर परिसर विकास आराखड्याला आपण सहकार्य करुत असा शब्दही त्यांनी याप्रसंगी दिला. तसेच शांतीवनचे प्रकल्प संचालक दीपकराव नागरगोजे यांनी बोलतांना सांगितले की, महिला सबलीकरण, शिक्षण, पाणी या विषयी पुढाकार घेवून समाजकार्य करावे मी नेहमीच सहकार्याच्या भूमीकेतून आपल्या सोबत असेल असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी शिवराज पवार व विविध मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल कौतूक केले. याकार्यक्रमास सिरसमार्गसह 10 गावातील ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष, युवक, युवती असे एकुण जवळपास 1 हजार नागरीकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद मगर सर यांनी केले. तर आभार डॉ. मनोज ओस्तवाल यांनी मानले.
समाजसेवेचा घेतलेला वसा कधीच टाकणार नाही – सौ. सिमा ओस्तवाल
समाजात अनेक वंचित, उपेक्षीत घटक आहेत अशा लोकांची सेवा मला करायची आहे, या सेवेमुळेच मला आत्म समाधान मिळते. मी घेतलेला समाजसेवेचा वसा कधीच टाकणार नाही. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी माझ्या परिने होईल तितके समाजाचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हे कार्य करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण मी डगमगत नाही. खंबीरपणे पुढे येवून गोरगरीबांना मदत करण्याचे माझे ध्येय आहे त्यातूनच मला उर्जा प्राप्त होते आणि अनेक अडचणी आपोआप सुटत जातात. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानने भूमिहिन, गरजू, विधवा व अपंग कुटूंबांना मोफत किराणा साहित्याचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे माझ्या प्रतिष्ठानच्या व्याप्ती मी वाढवणार असे उद्गार कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सौ. सिमा ओस्तवाल यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published.