Home » माझा बीड जिल्हा » पंचनामे तात्काळ करा अन्यथा आंदोलन – अँड.देशमुख

पंचनामे तात्काळ करा अन्यथा आंदोलन – अँड.देशमुख

पंचनामे तात्काळ करा अन्यथा आंदोलन – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा – अन्यथा आंदोलन – अँड. अजित देशमुख

बीड – बीड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे सावट पूर्णपणे दूर झाले असून आता पाण्याचे टॅंकर लागणार नाहीत. त्यामुळे टँकर माफियांना आता दुसरा धंदा निवडावा लागेल. मात्र शेतकऱ्यांची जी पिके अद्याप उभी आहेत, त्यात त्यांची नासाडी झाली आहे. ज्या ठिकाणी पिके उभी आहेत, ती काढता येत नाहीत. त्यामुळे या पिकाला अंकुर फुटलेले आहेत.

सोयाबीन देखील संकटात सापडले असून शेतकरी अतोनात परेशान झालेला आहे. निवडणुकीचे वारे चालू होते त्यामुळे याकडे पाहण्यासाठी कोणालाही फुरसत नव्हती. मात्र प्रशासन यातून बाहेर निघालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी. झोपलेले प्रशासन जागे झाले नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन व्यापक आंदोलन करेल आणि त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आलेला आहे.

भरपूर पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सुटला असून यावर्षी चारा छावण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच चारा छावणी चालकांच्या तावडीत शेतकरी सापडणार नाही.त्याच प्रमाणे पाणी टंचाई जाणवणार नाही.

पिकाचे झालेले नुकसान कसे भरून काढावे यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तात्काळ मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्रस्त झालेला शेतकरी यावर्षी पावसाच्या झपाट्यात सापडला असून शेतकरी राजा उभा करायचा असेल तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक झालेले आहे. तात्काळ पंचनामे केले गेले नाहीत तर पंचनामे व्यवस्थित होणार नाहीत आणि शासनाला नुकसान भरपाई बाबत निर्णय घेणे देखील अवघड होईल. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, यासाठी आपल्या तहसील कार्यालयात, मंडळ अधिकाऱ्यांना आणि गावातील तलाठ्याला लेखी निवेदन देऊन पंचनाम्याची मागणी करावी. या लोकांनी पंचनामे करण्यास नकार दिला तर आपल्या गावातील तलाठी कार्यालयासमोर, तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.