Home » महाराष्ट्र माझा » ना.जयदत्त क्षीरसागर यांचा विजय निश्‍चित

ना.जयदत्त क्षीरसागर यांचा विजय निश्‍चित

ना.जयदत्त क्षीरसागर यांचा विजय निश्‍चित

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – विधानसभा शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार ना.जयदत्त (आण्णा) क्षीरसागर हे बीडकरांना लाभलेले नेतृत्व आहे. आपल्या बीडकरांसाठी ते विकास पुरुष आहेत. म्हणुन या बीडच्या जननायकाला बीड शहरातुन जास्तीत जास्त येत्या 21 तारखेला मतदान करुन विजयी करावे असे अवाहन शिवसेनेचे बीड शहरप्रमुख सुनील सुरवसे व भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश गुरखुदे यांनी केले आहे.
पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब व लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आशिर्वादाने ना.जयदत्त क्षीरसागर यांना महायुतीत शिवसेनेकडुन उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना आपले अमुल्य मत देवुन बीडच्या विकासासाठी योगदान द्यावे. बीड शहरात सध्याच्या परिस्थितीनुसार मतदार विकास कामांना प्राधान्य देवुन महायुतीचे सरकार येणार असल्याने मतदार सुजान व हुशार आहे. त्यामूळे वरती सरकार योजना देतील व खाली नामदार झाल्यावर बीड शहरात चांगल्या योजना आणल्या जीतील. त्यामुळे आमीषाला बळी न पडता आपण बीड शहरातील मतदार आपले मत बीडचे खरे जननायक मा.जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनाच विजयी करुन आण्णांना मंत्रीमंडळात पाठवायचे आहे. तरी आपण आपले बहुमुल्य मत धनुष्यबान या चिन्हावर येत्या 21 तारखेला टाकुन महायुतीचे उमेदवार यांना विजयी करायचे आहे. असे अवाहन बीड शहरवासियांना शिवसेनेचे शहरप्रमुख सुनाल सुरवसे व भाजपचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.