Home » महाराष्ट्र माझा » बीडचे पाकीस्तान होण्यापासून रोखा – अ‍ॅड.धांडे

बीडचे पाकीस्तान होण्यापासून रोखा – अ‍ॅड.धांडे

बीडचे पाकीस्तान होण्यापासून रोखा – अ‍ॅड.धांडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड -विधानसभा निवडणूकीमध्ये एमआयएमचे उमेदवार अ‍ॅड. शेख शफीक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेवून बीडमध्ये औरंगाबादची पुनरावृत्ती करून बीडवर हिरवा झेंडा फडकवण्याची भाषा केली आहे. एमआयएमचे खा. ओवीसी यांनी देखील औरंगाबादचा प्रयोग बीडमध्ये यशस्वी होईल आणि एमआयएमचा उमेदवार अशी घोषणा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर युवा सेनेचे अ‍ॅड. महेश धांडे यांनी बीडचे पाकीस्तान होण्यापासून रोखा असा ईशारा हिंदु समाज बांधवांना एका पत्रकाद्वारे दिला आहे. मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असून निवडणूकीत सर्वांना मतदान कोणाला करायचे याचा अधिकार आहे त्यामुळे बीडचे औरंगाबाद करण्याची भाषा एमआयएमचे उमेदवार अथवा कार्यकर्त्यांनी करू नये असेही महेश धांडे यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.
बीड विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचार करताना एमआयएमचे उमेदवार अ‍ॅड. शेख शफीक यांनी क्षीरसागरचे पार्सल राजुरीला पाठवा असे आवाहन सर्व मुस्लिम वस्त्यांमध्ये जावून केले आहे. मुस्लिम वस्ती असोत किंवा शहरातील कुठलाही भाग असो त्या भागातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी सातत्याने केले आहे. बीड शहर हे शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे बीडचे औरंगाबाद करण्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. बीड विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असून जयदत्त क्षीरसागरांचा विजय कोणीही रोखु शकत नाही, मात्र जातीयवादी पक्षाच्या प्रचाराला बळी न पडता मुस्लिम बांधवांना देखील त्यांच्या कामी येणार्‍या जयदत्त क्षीरसागरांना समर्थन द्यावे आणि बीडचे पाकीस्तान होण्याचे रोखावे असे आवाहनही अ‍ॅड. महेश धांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.