Home » माझा बीड जिल्हा » जयदत्त क्षीरसागर यांना कलावंतांचा जाहीर पाठिंबा

जयदत्त क्षीरसागर यांना कलावंतांचा जाहीर पाठिंबा

जयदत्त क्षीरसागर यांना कलावंतांचा जाहीर पाठिंबा

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बीड हा कलाकारांचा बालेकिल्ला असून या कलाकारांना वेळोवेळी व्यासपीठ देण्याचे कार्य ना.जयदत्त क्षीरसागर यांच्या योगदानामुळे शक्य झाले. आज बीडमध्ये उभारलेली सांस्कृतिक चळवळीसाठी ना.जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचा पाठींबा असल्याने यापुढेही संस्कार आणि संस्कृतीसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संकृतीची जाण ठेवून जतन करणारे, तसेंच कलेचा विलास राजाश्रय शिवाय अपूर्ण असतो, त्यामुळे आम्हा कलाकाराचे मत जयदत्त अण्णा यांनाच असून अण्णा ना मत म्हणजे भौतिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकासास मत असेल असे नामवंत कलाकारांनी व्यक्त केले आणि एकमुखी पाठिंबा देऊन जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्याचा निर्धार केला

हॉटेल अणविता येथे कलावंतांचा मेळावा सम्पन्न झाला यावेळी ना.जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुलूक,कुंडलिक खांडे, डॉ उज्ज्वला वणवे, श्रीमती सम्पदा गडकरी, श्रीमती बांगर, श्रीमती चव्हाण, जेष्ठ रंगकर्मी भरत अण्णा लोळगे, पत्रकार महेश वाघमारे, डॉ पाटांगणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आपण बीड वासियाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून विकासाचा वसा घेतला आहे तो आजीवन पाळणार आहे, कलावंतांच्या भूमीत जन्मलो आहे, आमच्या कलावंतांची कलेची भूक भागवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, बीडच्या भूमीतील कलाकार टेलिव्हिजन वर चमकत आहेत असेच अनेक कलाकार इथल्या भूमीची शान ठरो आणि त्यांच्या यशाच्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलतांना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगिन विकास साधला जातो. आपली संस्कृती हीच आपले अलंकार असून संस्कृती, संस्कार आणि सांस्कृतिक विभागाच्या जोपासणे बरोबरच त्याची वृध्दीकरणे हे गरजेचे आहे. बीड शहरामध्ये ना.जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या पुढाकारातून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात 89 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, 4 थे लेखिका साहित्य संमेलन, 8 वे लेखिका साहित्य संमेलन, बालनाट्य प्रशिक्षण शिबीर गेल्या 17 वर्षांपासून अविरत, प्रत्येक महिन्याला नाट्य परिषदेच्या अंतर्गत सर्वांसाठी खुले व्यासपीठ,, राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सांस्कृतिक महोत्सव, काकू नाना प्रतिष्ठान अंतर्गत सिने कलावन्त, गायक गायिकांना बीडकरणा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, महिलांसाठी मेहंदी रांगोळी पासून भजन, फॅशन शो पर्यंत अनेक कार्यक्रम, सेल्फ डिफेन्स अंतर्गत। अनेक कार्यक्रम निर्मित झिम्मा नाटकाचे 3प्रयोग, असेच दर्जेदार कार्यक्रम यापुढेही घेण्यात येतील असे आश्वासन डॉ.दीपा क्षीरसागर यांनी यावेळी दिले. तर जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे म्हणाले की, कलाकारांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणारे केवळ जयदत्त क्षीरसागर च असल्याने कलाकाराचा सम्पूर्ण जाहीर पाठिंबा असून आमचे मत केवळ जयदत्त क्षीरसागर यांनाच असेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार मिलिंद शिवणीकर यांनी केले. तमाम नाट्य, सिने तसेच विविध क्षेत्रातील कलांवताची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.