Home » माझा बीड जिल्हा » विकासकामे फेकाफेकी करून होत नसतात – क्षीरसागर

विकासकामे फेकाफेकी करून होत नसतात – क्षीरसागर

विकासकामे फेकाफेकी करून होत नसतात – क्षीरसागर

— विकासकामे करून दाखवावी लागतात ती फेकाफेकी करून होत नसतात..

— जयदत्त क्षीरसागरांचा विरोधकांवर हल्लाबोल

बीड – बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी डोंगरपट्ट्यात कॉर्नर बैठका घेऊन रान उठवले आहे. बोरफडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, सुशिल पिंगळे, पंजाब काकडे, गणेश वरेकर, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, तात्या डोईफोडे, अरूण डाके, शिवानंद कदम, डॉ.आंधळे, सखाहरी गदळे, तुळशीराम महाराज, उत्तमराव महाराज, महादेव घुगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, डोंगरपट्ट्यातील बोरफडी या गावातील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या या विकासाच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाचा जो विकास असतो तो विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. जे खाते मला मिळाले त्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकर्‍यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले. या भागातील जनतेचा आपण नेहमीच आदर केला आहे. या निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणार्‍यांना बाजूला सारा, गट तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा, विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, आपला हक्काचा माणूस आमदार होणार आहे. पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाणार आहे. जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभे राहायचे आहे. शिवसेनेच्या नावावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. ते सर्व एकत्र येऊन शिवसेनेचा अपप्रचार करत आहेत. शिवसेनेचा अपप्रचार करणार्‍याची शिवसैनिक वाट लावत असतो. शिवसैनिकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिवाचे रान करून जयदत्त क्षीरसागरांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. खांद्यावर बाण घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना थेट मंत्रालयामध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण मदतीचा खारीचा वाटा उचला असे आवहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला सुशील पिंगळे, डी.एस.कदम, अरूण बोंगाने, साहेबराव पोकळे, परमेश्वर घुमरे, तात्या डोईफोडे, सुरेश घुगे, झुंजार धांडे, लालासाहेब घुगे, विलास कुटे, महादेव घुगे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.