Home » राजकारण » ना.क्षीरसागराची निवडणूक अनिल जगताप यांनी घेतली हाती !

ना.क्षीरसागराची निवडणूक अनिल जगताप यांनी घेतली हाती !

ना.क्षीरसागराची निवडणूक अनिल जगताप यांनी घेतली हाती !

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – एखाद्याची जनमानसात आदराची छाप असते, समाजकार्याची याला जोड असते, माणुसकी ची झालर असते, आदरयुक्त दरारा असतो, अन असा व्यक्ती पाठीशी उभा राहिला की सगळे प्रश्न अचानक सुटतात असे चित्र बीड मध्ये पाहण्यास मिळत आहेत, अनिल जगताप मैदानात उतरले अन जयदत्त क्षीरसागराचा विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला, कारण शिवसैनिकांना एका माळेत गुंफण्याचे काम करत अनिल जगताप यांनी हजारो माणसे जोडली ते क्षीरसागराच्या कामी आली.
बीड विधानसभा मतदार संघात शिवसेना घरा घरा पोहोचवण्याचे काम अनिल जगताप यांनी केले वयाच्या सोळाव्या वर्षांपासून आजपर्यंत निष्ठे ने शिवसेनेची बांधिलकी जोपासणारा हा माणूस शिवसेनेचा खरा चेहरा मानला जातो, शिवसेना वाढवली , शिवसेना बांधली , शिवसेनेचे काम प्रामाणिक पणे केले, कोणती ही अपेक्षा न ठेवता भगव्या चा सन्मान वाढवण्याचे काम अनिल जगताप गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत, बीड ची जागा शिवसेनेला सुटली ,जयदत्त क्षीरसागराना उमेदवारी मिळाली,विरोधकांना वाटले आता अनिल जगताप काय करणार पण मातोश्री वर नितांत श्रद्धा असणाऱ्या अनिल जगताप यांनी कोणती ही अपेक्षा मनात न बाळगता भगवा हातात घेऊन कामाला सुरुवात केली, गावागावात शिवसैनिक त्याच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले होते, अनिल जगताप हे जयदत्त क्षीरसागराच्या विजयासाठी मैदानात उतरले अन तरुणांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला, मी एक सच्चा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा आदेश आपल्यासाठी अंतिम आहे,ना पदाची ना सत्तेची अपेक्षा भगव्या साठी जगत आलोय, असे म्हणत अनिल जगताप जयदत्त क्षीरसागराची धावून आले , अनिल जगताप यांनी प्रचाराची धुरा हाती घेताच क्षीरसागराचा विजयाचा आत्मविश्वास वधारला, जगताप याच्या परोपकारी वृत्तीचा फायदा क्षीरसागराना होत आहे, केवळ शिवसैनिकच नाही तर माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले ते काम क्षीरसागराची कामी आले.

Leave a Reply

Your email address will not be published.