Home » महाराष्ट्र माझा » जयदत्त क्षीसागरांच्या प्रचारासाठी जगताप मैदानात

जयदत्त क्षीसागरांच्या प्रचारासाठी जगताप मैदानात

जयदत्त क्षीसागरांच्या प्रचारासाठी जगताप मैदानात

डोंगरचा राजा / आँनलाईन

– बीडमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित.

बीड – एखाद्याची जनमानसात आदराची छाप असते, समाजकार्याची जोड असते, माणुसकीची झालर असते, आदरयुक्त दरारा असतो, आणि अशी व्यक्ती पाठीशी उभा राहिली की सगळे प्रश्न अचानक सुटतात, असे चित्र बीडमध्ये पाहण्यास मिळत आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ अनिल जगताप मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांना एका माळेत गुंफण्याचे काम करत अनिल जगताप यांनी हजारो माणसे जोडली आहेत, त्यामुळे आता बीडमध्ये शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

बीड विधानसभा मतदार संघात शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम अनिल जगताप यांनी केले. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून आजपर्यंत निष्ठेने शिवसेनेची बांधिलकी जोपासणारा हा माणूस शिवसेनेचा चेहरा मानला जातो. शिवसेना वाढवली, शिवसेना बांधली, शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता भगव्याचा सन्मान वाढवण्याचे काम अनिल जगताप गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत. बीडच्या जागेवर जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी मिळाली. विरोधकांना वाटले आता अनिल जगताप काय करणार पण मातोश्रीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या अनिल जगताप यांनी कोणती ही अपेक्षा मनात न बाळगता भगवा हातात घेऊन कामाला सुरुवात केली. गावागावात शिवसैनिक त्याच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले होते.

अनिल जगताप हे जयदत्त क्षीरसागराच्या विजयासाठी मैदानात उतरले अन तरुणांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांचा आदेश आपल्यासाठी अंतिम आहे. ना पदाची ना सत्तेची अपेक्षा भगव्या साठी जगत आलोय, असे म्हणत अनिल जगताप जयदत्त क्षीरसागराची धावून आले. अनिल जगताप यांनी प्रचाराची धुरा हाती घेताच क्षीरसागराचा विजयाचा आत्मविश्वास वधारला. जगताप याच्या परोपकारी वृत्तीचा फायदा क्षीरसागराना होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.