रविवारी शिवक्रांतीची बैठक – बजगुडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
– विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी शिवक्रांतीची बैठक
बीड – सध्या होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाणे बीड जिल्हा शिवक्रांती संघटनेची बैठक रविवार दि. 13 आँक्टोबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता कपिलधार याठिकाणी शिवक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आपल्या संघटनेची योग्य दिशा ठरवुन पाठिंबा जाहिर करण्यात येणार आहे. प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, केज-अंबाजोगाई, परळी, आष्टि-पाटोदा व माजलगाव या सहाही मतदार संघात शिवक्रांतीची निर्णायक ताकत व भुमिका महत्वपुर्ण आसुन जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हासंपर्क प्रमुख राजेश गीरी, जिल्हाकार्याध्यक्ष आकाश पवार, जिल्हाउपाध्यक्ष शिवराम शिंदे, जिल्हासरचिटणीर अमोल पाटिल, जिल्हासंघटक अविनाष मोरे, विधार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब गोरे, बीड तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, शिरुर तालुकाध्यक्ष आत्माराम पवार, गेवराई तालुकाध्यक्ष संतोष पवळ, पाटोदा तालुकाध्यक्ष श्रीराम तांबे, माजलगाव तालुकाध्यक्ष गहिनीनाथ जाधव, केज तालुकाध्यक्ष अजित धपाटे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष सत्यम पवार ईत्यादि पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.