Home » माझी वडवणी » आडसकरांच्या पदयात्रेने शहर भाजपमय

आडसकरांच्या पदयात्रेने शहर भाजपमय

आडसकरांच्या पदयात्रेने शहर भाजपमय

डोंगरचा राजा / आँनलाईन

– विविध प्रभागात भाजपचा डोअर टू डोअर प्रचार*

माजलगाव — भारतीय जनता पक्षाचे माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार रमेश आडसकरांनी आज दी 11 रोजी माजलगाव शहरात पदयात्रा काढून डोअर टू डोअर प्रचार केला त्यांच्या मतदारांशी थेट गाठी भेटीमुळे माजलगाव शहर भाजपमय बनले

भारतीय जनता पक्षाचे माजलगाव मतदार संघाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी आज दी 11 रोजी माजलगाव चे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक करून सिद्धेश्वरला माजलगाव मतदारसंघातील जनतेच्या सुख कल्याणाची कामना केली नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांन समवेत त्यांनी पद यात्रेचा शुभारंभ केला जुना तहसील मार्ग, झेंडा चौक, पाटील गल्ली, हनुमान चौक, डॉ आंबेडकर चौक, गजानन नगर, छ शिवाजी चौक बीड रोड ते छ संभाजी महाराज चौक या मार्गे पदयात्रेचा संपर्क कार्यालया समोर समारोप करण्यात आला पदयात्रेतील घोषणांनी माजलगाव शहर दणाणून गेले जुन्या मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी सदरील पदयात्रेवर पुष्पवृष्टी केल्याने कौतुकाचा विषय झाला पदयात्रे दरम्यान स्वतः उमेदवार रमेश आडसकरांनी नगरवासीयांच्या व माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील भेट घेऊन त्यांचे विजयासाठी आशिर्वाद घेतले आजच्या पदयात्रेला माजलगाव करांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने रमेश आडसकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे
दरम्यान या भव्य रॅलीत भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते व शहर वासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published.