Home » माझी वडवणी » विभागीय सचिवपदी साळुंके तर राज्य सदस्यपदी वाघमारे

विभागीय सचिवपदी साळुंके तर राज्य सदस्यपदी वाघमारे

विभागीय सचिवपदी साळुंके तर राज्य सदस्यपदी वाघमारे

डोंगरचा राजा /आँनलाईन

– मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी विशाल साळुंके तर सदस्यपदी अनिल वाघमारे

बीड – मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद विभागाच्या सचिवपदी विशाल साळुंके यांची तर राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अनिल वाघमारे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबईच्यावतीने राज्याच्या आणि विभागाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून राज्याच्या कोेषाध्यक्षपदी विजय जोशी, उपाध्यक्षपदी योगेश कोरडे, शिवराज काटकर, यशवंत पवार, प्रमोद माने, सुरेश नाईकवाडे, राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बरोबरच महाराष्ट्रातील सर्व विभागाच्या विभागीय सचिवांची नियुक्ती करण्यात आली असून औरंगाबाद विभागाच्या सचिवपदी बीड येथील पत्रकार विशाल साळुंके, पुणे विभाग बापुसाहेब गोरे, लातूर विभाग प्रकाश कांबळे, नागपूर विभाग अविनाश भांडेकर, नाशिक विभाग मन्सुरभाई, अमरावती विभाग जगदीश राठोड, कोकण विभाग विजय मोकल यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणी सदस्यपदी वडवणीचे अनिल वाघमारे, रोहिदास हाके, महिला संघटकपदी रत्नागिरीच्या जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या 2 वर्षासाठी रहाणार आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकार परिषदेची ही नवीन टीम आपल्या कार्यकाळात परिषद अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करेल. तसेच राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल नुतन पदाधिकार्‍यांचे परिषदेचे माजी सरचिटणीस अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस विलास डोळसे व सर्व संपादक व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.