Home » माझा बीड जिल्हा » सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या – ना. क्षीरसागर

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या – ना. क्षीरसागर

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या – ना. क्षीरसागर

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बौध्द समाजाने दिलेला शब्द काळया दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी पंधरा दिवस द्या पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना ना.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
हॉटेल अन्विता येथे शनिवारी दि. 05 रोजी बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, न.से.संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वडमारे हे होते.
पुढे बोलताना भाजप-शिवसेना, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्टया करून भागत नाही त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून समुद्राला वाहून जाणारे 600 टी.एम.सी. पाणी मराठवाड्यातील 11 मोठ्या तलावात सोडून पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्‍न 2022 पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, आंधळ्याची काठी, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आपला आशिर्वाद द्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या उषा सरवदे म्हणाल्या की, बीड मतदार संघात आण्णा हेच पक्ष मानून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबा आणि गोरगरीबांची, दलित पिडीतांची सेवा करणार्‍या जयदत्त आण्णांना विधानसभेत पाठवा.
याप्रसंगी रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण म्हणाले की, आमचे नेते आण्णासाहेब आहेत आमचा पक्ष म्हणजे आण्णा. आण्णांना प्रचंड बहूमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
अशोक कांबळे म्हणाले की, दलित समाज आणि काकू-आण्णा-डॉ.भारतभूषण हे आमच्या गोरगरीबांचे बीडमधील तारणहार आहेत. त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिलीप भोसले यांनी केले. याप्रसंगी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगिता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे, कमल पेठे, बबिता जावळे, जयश्री गवळी, कांता सरवदे, दिपा वंजारे, ईश्‍वरी धन्वे आदिंसह पुरूष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.