Home » महाराष्ट्र माझा » माध्यमांनी स्वयंनियमन ठेवावे – जिल्हाधिकारी

माध्यमांनी स्वयंनियमन ठेवावे – जिल्हाधिकारी

माध्यमांनी स्वयंनियमन ठेवावे – जिल्हाधिकारी

डोंगरचा राजा / आँनलाईन

– सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक, मुद्रित माध्यमांनी स्वयंनियमन ठेवावे – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

बीड – जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने निवडणूक व उमेदवारांबद्दल वस्तुनिष्ठ वृत्तांत देणे हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य आहे. निवडणूक कालावधीत पेड न्यूजच्या घटना रोखण्यासाठी स्वयं नियमन हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांनी आणि वृत्तपत्रांच्या ई पेपर आवृत्तींनीही पेड न्यूज संदर्भात स्वयंनियमन ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिद्धीपूर्व प्रमाणिकरण केले असल्याची खात्री करुनच राजकीय जाहिराती प्रसारित करण्याची दक्षता घ्यावी. प्रसारमाध्यमांनी विवक्षित कार्यक्रमाच्या प्रक्षेपणामुळे धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय किंवा सामाजिक किंवा इतर कोणत्याही कारणावरुन विविध वांशिक ,भाषिक किंवा प्रादेशिक गटांमध्ये, जातींमध्ये किंवा समाजामध्ये अशांती, शत्रुत्व भाव, द्वेष किंवा तणाव निर्माण होण्याचा संभव असेल किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा संभव असेल तर, असे वृत्त प्रसारित करु नये. मतदारांवर प्रभाव टाकणारे, आर्थिक मोबदला, प्रलोभन स्वीकारून वृत्त प्रसारित करू नये. एखादा उमेदवार किंवा पक्षाला फायदा करून देणारे वृत्त प्रसिद्ध करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डस् ऑथ़रिटी (एनबीएसए) या संस्थांच्या मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया वर पोस्ट करतानाही स्वनियमन ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.