Home » माझा बीड जिल्हा » बीड मध्ये भगवे वादळ.. क्षीरसागराची भव्य रॅली

बीड मध्ये भगवे वादळ.. क्षीरसागराची भव्य रॅली

बीड मध्ये भगवे वादळ.. क्षीरसागराची भव्य रॅली

डोंगरचा राजा/ आँनलाईन

बीड – शिवसैनिकांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होते याचे चित्र बीड मध्ये दिसत आहे, जयदत्त क्षीरसागर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत, प्रचंड शक्ती प्रदर्शन, भगवे वादळ बीड च्या रस्त्या स्त्यावर अवतरले आहे, हे भगवे तुफान निवडणुकीचा निकाल काय असणार हे सांगत आहे, बीड वर 15 वर्षांनंतर भगवा ध्वज फडकणार असल्याने बीड वासीयामध्ये उत्साह संचारला आहे.
बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्यापासून विराट रॅली ला सुरुवात झाली आहे, गावागावातून शिवसैनक दाखल झाले आहे, हातात भगवा घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे, ऐतिहासिक रॅली ला सुरुवात झाली आहे शहरातील रस्ते प्रचंड गर्दीने खचाखच भरले आहेत शहरात भगवे वादळ निर्माण झाले आहे, महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे, जमेल त्या वाहनाने शिवसेनेच्या घोषणा करत शिवसैनिक बीड मध्ये दाखल झाल्याने , संपूर्ण शहर भगवे मय झाले आहे, जयदत्त क्षीरसागर रॅली मध्ये दाखल झाले आहे, रॅली माळीवेस, कारंजा रोड , मार्गे छत्रपती पुतळ्याचे दिशेने मार्गस्थ झाली आहे, जमेदवारी अर्ज दाखल करून माने कॉम्प्लेक्स मैदानात विराट सभा होणार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published.