Home » माझी वडवणी » तुम्हाला कधीच विसरणार नाही – रमेश आडसकर

तुम्हाला कधीच विसरणार नाही – रमेश आडसकर

तुम्हाला कधीच विसरणार नाही – रमेश आडसकर

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव – मी माजी आमदाराचा मुलगा असलो तरी तुमच्यासारख्या सामान्य माणसातच माझं आयुष्य गेलंय. यामुळे तुमच्यासारख्या बूथ प्रमुख, सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरच आमदार होणार आहे. पुढील पाच वर्ष तुम्हाला कधीच विसरणार नसून माझी आमदारकी ही  केवळ तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठीच असेल. असा विश्वास भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. दोन) दुपारी वैष्णवी मंगलकार्यालयात आयोजित तालुक्यातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी भाजपचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. प्रकाश आनंदगावकर, नगराध्यक्ष सहाल चाऊस, सुभाष धस, हनुमान कदम, बबनराव सोळंके, अरुण राऊत, डॉ. अशोक तिडके, अमरनाथ खुर्पे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना रमेश आडसकर म्हणाले की, मागील पाच वर्षात भाजप सरकारने केंद्रात, राज्यात मोठ्याप्रमाणात विकासाचे कामे केल्याने सर्वसामान्य माणूस समाधानी झालेला आहे. मी भाजपात आल्यापासून केवळ पक्षासाठीच काम करीत असून पक्षाचा कार्यकर्ताच माझ्यासाठी सर्वस्व आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे माझे काही सहकारी नाराज झाले असले तरी तुम्ही, आम्ही मिळून त्यांची नाराजी दुर करत पक्षासोबत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पक्षाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला असला तरी विजयाची वाट तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ताच दाखविणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही कामाला लागावे. तुमच्या आशीर्वादानेच मी आमदार होणार असून माझी आमदारकी केवळ सामान्य कार्यकर्त्यांसाठी सत्कारणी लावणार असल्याचा विश्वास रमेश आडसकरांनी मेळाव्यातील बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांना दिला.

या मेळाव्याला तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता महाजन यांनी केले तर, आभार मनोज फरके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.