Home » राजकारण » मोहन जगतापांची तलवार म्यान?

मोहन जगतापांची तलवार म्यान?

मोहन जगतापांची तलवार म्यान?

-आ.सुरेश धस यांनी केली मध्यस्थी

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव – माजलगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेले मोहन जगताप बंडाच्या तयारीत होते. मात्र, विधान परिषदेबाबत शब्द मिळाल्यानंतर मोहन जगताप यांनी तलवार म्यान केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी आडसकर यांचा मार्ग सुकर झाला आहे.

मोहन जगताप यांचे उमेदवारी प्रचंड प्रयत्न सुरु होते. परंतु, उमेदवारी मिळविण्यात आडसकरांनी बाजी मारली. त्यानंतर नाराज म्हण जगताप यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे जगताप यांची समजूत घालण्याची जिम्मेदारी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आ. सुरेश धस यांच्यावर सोपविली होती. बुधवारी आ. धस यांनी माजलगावात जगताप यांची छत्रपती कारखान्यावर भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा झाली. त्यानंतर जगताप आपली उमेदवारी माघारी घेण्याबाबत सकारात्मक झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सुत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी जगताप आणि आडसकर माजलगावात काम करीत होते त्याचवेळी दोघांपैकी एकाला उमेदवारी तर दुसर्‍याला विधान परिषदेवर घेण्याबाबत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शब्द दिला होता. दरम्यान, मोहन जगताप यांनी माघार घेतल्यास रमेश आडसकर यांना मोठा फायदा होणार असून त्यांची बाजू अधिक भक्कम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.