Home » ब्रेकिंग न्यूज » अखेर नमिता मुंदडा यांचा भाजपा प्रवेश

अखेर नमिता मुंदडा यांचा भाजपा प्रवेश

अखेर नमिता मुंदडां यांचा भाजपा प्रवेश

डोंगरचा राजा / आँनलाईन

केज मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी फायनल केल्यानंतर नमिता मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत भाजपात प्रवेश केला.यावेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, अक्षय मुंदडा यांची उपस्थिती होती.

काल रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली आहे. त्यात केजमधून नमिता मुंदडा यांचे नाव आहे. नमिता मुंदडा यांना खुद्द शरद पवारांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे मुंदडा यांच्या भाजपा प्रवेशाला महत्व आले आहे. नमिता मुंदडा या दिवंगत राष्ट्रवादीच्या नेत्या विमलताई मुंदडा यांच्या सून आहेत. मुंदडा यांनी आपला राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.