Home » माझा बीड जिल्हा » बीड जिल्ह्यात दोन खर्च निरीक्षक नियुक्त

बीड जिल्ह्यात दोन खर्च निरीक्षक नियुक्त

बीड जिल्ह्यात दोन खर्च निरीक्षक नियुक्त

डोंगरचा राजा / आँनलाईन

– जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांसाठी दोन खर्च निरीक्षक नियुक्त

बीड – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता दिनांक 21 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान तर 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघासाठी 2 खर्च ऑबझर्वर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे बीड जिल्ह्यात आगमन झाले आहे. ते शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्यास आहेत.
2 खर्च ऑबझर्वर यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे 228-गेवराई, 229-माजलगाव, 233-परळी विधानसभा मतदार संघासाठी मानष कछारी (7038668433) 230-बीड, 231-आष्टी, 232- केज विधानसभा मतदार संघासाठी रवी कुमार (7756843453).

Leave a Reply

Your email address will not be published.