Home » माझा बीड जिल्हा » जगण्याची नवी दिशा मिळते – हभप रामदासी

जगण्याची नवी दिशा मिळते – हभप रामदासी

जगण्याची नवी दिशा मिळते – हभप रामदासी

डोंगरचा राजा / आँनलाईन

-ह.भ.प. प्रभाकरबुवा पारेकर स्मृति किर्तन महोत्सवाचा समारोप

अंबाजोगाई – आध्यात्मातून मानवाला जगण्याची नवी दिशा मिळते. समाजातील दुर्गुणांवर मात करण्यासाठी सद्गुणी लोकांचा प्रभाव वाढला पाहिजे तरच दुर्गुणांवर मात होईल. यासाठी सकारात्मक विचारसरणी जोपासून आध्यात्माचा अंगिकार करा. असे आवाहन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांनी केले.
येथील ब्राम्हण संघटनच्या वतीने आयोजित ह.भ.प. प्रभाकरबुवा पारेकर किर्तन महोत्सवाच्या समारोपाच्या किर्तनात भरतबुवा रामदासी यांचे किर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. भरतबुवा म्हणाले की, रामायण, महाभारत या आदर्श ग्रंथातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम या ग्रंथांनी केले. माणूस सत्कर्माला लागला तर त्याला मनशांती मिळते. त्याची प्रगती होते. मात्र, तो अधर्माकडे वळला तर तो विनाशाकडे जातो. हे आपण समाजात दैनंदिन पाहत आहोत. समाजाला सुस्थितीत आणण्यासाठी व त्यांचे प्रबोधन घडवून आणण्यासाठी किर्तन महोत्सव हे प्रभावी माध्यम आहे. गेल्या १८ वर्षांपासून ब्राम्हण संघटन हा प्रबोधनाचा उपक्रम राबवित असल्याचे कौतुक त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ किर्तनकार शंकरबुवा केजकर यांच्या योगदानाबद्दल तर भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी राम कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल आनंद टाकळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर किर्तन महोत्सवात योगदान दिलेल्या व्यक्तींचा यावेळी भरतबुवा रामदासी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सलग ७ दिवस झालेल्या या किर्तन महोत्सावाला महिला व भाविकांची मोठी गर्दी होती.

Leave a Reply

Your email address will not be published.